सिंदी (रेल्वे),
sindi-railway-cotton-market कापसाची उलंगवाडी होण्यास सुरुवात झाली आणि अचानक कापसाच्या भावात तेजी आली आहे. आज सेलूच्या उपबाजारपेठेत केवळ ३९ कापूस गाड्यांची आवक झाली. यावेळी कापसाला ८ हजार २०० रुपये भाव मिळाला आहे. यंदा कापसाचे उत्पन्न दरवर्षीच्या तुलनेत कमी आहे. तसेच सी. सी. आय.ची खरेदी सुरू होण्यापूर्वी खुल्या बाजारात व्यापारी ७ हजार रुपये प्रतिविंटल दर देऊन देखील शेतकर्याशी घासाघीस करीत होते.
(फोटो इंटरनेटवरून साभार)
sindi-railway-cotton-market मात्र, शासनाची कापूस खरेदी सुरू झाली आणि शेतकर्यांना थोडाफार दिलासा मिळू लागला. जिल्ह्यात सर्वाधिक कापूस संकलित हिंगणघाट बाजार समितीच्या आवारात होत असते. परंतु, यंदा तेथे सुद्धा दररोज कापसाच्या ७०० गाड्यांऐवजी या आठवड्यात ३०० गाड्यांची आवक असल्याचे कापूस उत्पादक शेतकरी सांगतात. या भागात चिमणाझरी, जसापूर, कांढळी आणि सेलडोह येथे कापूस संकलन केंद्र सुरू झाल्यामुळे हिंगणघाटचा नाद शेतकर्यांनी सोडल्याची प्रतिक्रिया शेतकर्यांकडून ऐकायला मिळत आहे.