स्नेहारिकाने पटकविले तीन सुवर्ण व रोख पारितोषिक

10 Jan 2026 18:48:54
सालेकसा,

Sneharika Rajesh Patle येथील शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालयाची एमएससी प्राणीशास्त्र विभागाची विद्यार्थिनी स्नेहारिका राजेश पटले ही नागपूर विद्यापीठातुन प्रथम आली आहे. तिने तीन सुवर्ण पदकासह रोख पारितोषिके पटकावली. ९ जानेवारी रोजी नागपूर येथे आयोजित ११३ व्या दीक्षांत समारंभामध्ये नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, अनंत पंढरे यांच्या उपस्थितीत स्नेहारिकाला पदक, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

 Sneharika Rajesh Patle 
विद्यापीठातून प्राणीशास्त्र विषयात प्रथम आल्याबद्दल डॉ. ए. गोपालक्रिष्ण सुवर्ण पदक, मुलींमधून प्रथम आल्याबद्दल स्व. प्राध्यापिका शालिनी बाळासाहेब देशमुख सुवर्ण पदक, कीटकनाशक विषयात प्रथम आल्याबद्दल डॉ. व्ही. के. ठाकरे सुवर्ण पदक आणि प्राध्यापिका एम. एस. शास्त्री रोख पारितोषिक बहाल करून स्नेहारिकाला गौरविण्यात आले.
स्नेहारिकाला डॉ. संतोष Sneharika Rajesh Patle पुरी यांनी नोट्स कशा बनवायच्या, मुद्देसूद प्रश्नांची उत्तरे कसे लिहायेचे, प्रोजेक्ट कसे बनवायचे, संचालन कसं करायचं, सेमिनार कसे द्यायचे, भाषण कसे द्यायचे यासह प्रत्यक्ष फिल्ड रीसर्च करण्यासाठी वेळोवेळी सतत मार्गदर्शन केले. याशिवाय इतरही प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. स्नेहारिकाच्या यशाबद्दल पोवार समाज तसेच सामाजिक कार्यकर्ता कैलास गजभिये यांनी तिचा सत्कार केला. स्नेहारिकाने तिच्या यशाचे श्रेय आजोबा मालिकराम, आजी जयवंता, आई उषा, वडील राजेश पटले, संस्था सचिव प्रफुल्ल अग्रवाल, प्राचार्य डॉ. एस. एन. मूर्ती, प्रा. डॉ. संतोष पुरी, डॉ. पी. एस. ठाकूर, जी. व्ही. आडे, डॉ. ए. एस. भदौरिया, डॉ. एस. आय. खान, योगेश रहांगडाले यांना दिले आहे.
 
 
 
 
विद्यार्थ्यांना योग्य गुरू व मार्गदर्शन मिळाल्यास व प्रामाणिकपणे चार-पाच तास अभ्यास केल्यास विद्यार्थी निश्चितच यशोशिखर गाठू शकतात. प्रा. डॉ. संतोष पुरी गोल्ड मेडालिस्ट असून त्यांना आदर्श मानतो. त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आहे. त्यांचे व गुरूजनांचे मार्गदर्शनामुळेच यश प्राप्त करू शकलो.
- स्नेहारिका राजेश पटले
Powered By Sangraha 9.0