नागपूर,
Social service मानवी जीवन जगताना माणूस अनेक भूमिका पार पाडत असतो. उदरनिर्वाहासाठी केले जाणारे अर्थार्जन हे त्यातील एक माध्यम असून, त्या माध्यमातून जी भूमिका निभावली जाते तो काळ म्हणजे सेवा कालावधी. मात्र निवृत्ती ही केवळ सेवेतून होते, सेवाभावातून नाही. सेवा ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि त्यातूनच जीवनाचा खरा आनंद मिळतो, असे प्रतिपादन श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक ज्ञानेश्वरदादा रक्षक यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कर्मचारी रमेश मेहर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. Social service रमेश मेहर यांनी विद्यापीठात ३५ वर्षे प्रामाणिक सेवा बजावून ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्ती स्वीकारली आहे. त्यांच्या भावी समाजसेवेकरिता आरोग्यदायी आणि दीर्घायुष्य लाभावे, अशा शुभेच्छाही ज्ञानेश्वरदादा रक्षक यांनी दिल्या.
यावेळी रमेश मेहर यांचा सहपत्नी शाल, श्रीफळ व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे छायाचित्र देऊन नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विद्यापीठातील कर्मचारी वर्ग, नातेवाईक, श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते तसेच हावरापेठ मित्र मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. Social service उपस्थित मान्यवरांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन रमेश मेहर यांचा सहपत्नी गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल चकोले यांनी केले, तर आभार प्रदर्शन पराग मेहर यांनी केले. सामुदायिक प्रार्थनेनंतर कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रवंदनाने करण्यात आला.
सौजन्य: ज्ञानेश्वर रक्षक, संपर्क मित्र