वृद्धेचा खून करणार्‍या आरोपीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या

10 Jan 2026 17:06:13
वाशीम,
murdered old woman येथील रेल्वे स्थानक परिसरातील ६० वर्षीय निराधार वृद्ध महिलेची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करणार्‍या संतोष रामराव खंडारे (रा. अडुळा बाजार, जि. अमरावती) या नराधमाला पोलिसांनी २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. हा आरोपी केवळ गुन्हेगार नसून, तो एक विकृत आणि वासनांध ‘सायको ’ असल्याचे तपासात समोर आले आहे.
 
 

वृद्धेचा खून  
 
आरोपी संतोष खंडारे याची पार्श्वभूमी अंगावर शहारे आणणारी आहे. त्याने आतापर्यंत तीन लग्ने केली, मात्र त्याच्या विक्षिप्त स्वभावाला आणि विकृत वागण्याला कंटाळून तिन्ही पत्नी त्याला सोडून गेल्या. दिवसभर नशेच्या धुंदीत राहणार्‍या या सैतानाने वाशीम रेल्वे स्थानक परिसरात एका असहाय्य वृद्धेला आपली शिकार बनवले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक अनुज तारे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला युद्धपातळीवर तपासाचे आदेश दिले होते. पोलिसांनी परिसरातील ४० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरून एक संशयीत इसम निष्पन्न झाला.murdered old woman आरोपी अकोल्याच्या दिशेने पळाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे सापळा रचला आणि १० जानेवारी रोजी त्याला अकोला रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसी खाया दाखवताच त्याने वृद्धेची हत्या केल्याची कबुली दिली.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. प्रदीप परदेशी, संजय चौधरी, सपोनि योगेश बांगर आणि त्यांच्या पथकाने केली. विशेषतः राजकुमार यादव, संदीप दुतोंडे, अमोल इरतकर, दीपक घुगे आणि सुनील तायडे यांनी या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. पुढील तपास सपोनि अरुण नागरे करत आहेत.
Powered By Sangraha 9.0