आष्टी तालुक्यातील तीन सर्पमित्रांचा नागपुरात ‘विदर्भ वीर पुरस्कारा’ने गौरव

10 Jan 2026 17:02:27
तळेगाव (श्या. पं.), 
vidarbha veer award निसर्ग आणि वन्यजीव रक्षणासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कार्य करणार्‍या आष्टी तालुयातील तीन तरुणांना नागपूर येथे ‘विदर्भ वीर पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रीतम गायकी (लहान आर्वी), वैभव मेंढे (पेठ अहमदपूर) आणि निखिल खडसे (तळेगाव श्यामजी पंत) या धाडसी सर्पमित्रांचा समावेश आहे.
 

सर्पमित्र  
 
 
नागपूर येथील वाइल्डलाईफ सोशल वेल्फेअर असोसिएशन या संस्थेमार्फत हा पुरस्कार सोहळा पार पडला. हे तिन्ही तरुण गेल्या अनेक वर्षांपासून आष्टी आणि आर्वी परिसरात मानवी वस्तीत शिरलेल्या विषारी व बिनविषारी सापांना सुरक्षितरित्या पकडून त्यांना निसर्गात मुत करण्याचे कार्य करत आहेत. केवळ सर्पमित्र म्हणूनच नव्हे, तर जखमी पक्ष्यांवर उपचार करणे आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी जनजागृती करण्यातही या तिघांचा मोठा वाटा असून पर्यावरण क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे.
साप वाचवण्यासोबतच या तरुणांनी वृक्षारोपण यासारखी महत्त्वाची कामे स्वखर्चाने व श्रमदानाने केली आहेत. त्यांच्या या नि:स्वार्थी कामाची दखल घेऊनच त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन नागपूर येथील पक्षी सम्राट किरण पुरंदरे यांच्या हस्ते तीनही तरुणांचा सन्मान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त केल्यानंतर प्रीतम गायकी, वैभव मेंढे आणि निखिल खडसे या तिघांनीही आर्वीच्या पर्यावरण बचाव समितीचे आभार मानले आहे. समितीच्या पाठबळामुळे आणि त्यांनी दिलेल्या व्यासपीठामुळेच आम्हाला हे कार्य करण्याची ताकद मिळाली. हा पुरस्कार आमच्या एकट्याचा नसून तो संपूर्ण समितीच्या कार्याचा सन्मान आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यत केली. नागपूर येथील वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशन या संस्थेमार्फत हा पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात पार पडला.
Powered By Sangraha 9.0