वर्धा जिल्हाभर राबविली वॉशआउट मोहीम

10 Jan 2026 20:19:11
वर्धा, 
 
wardha-liquor-surgical-strike जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि निर्मितीच्या साखळीवर पूर्णपणे आळा घालण्यासाठी पोलिसांनी शुक्रवार ९ रोजी १९ पोलिस ठाण्यांतर्गत नियोजनबद्ध वॉशआउट मोहीम राबविली. या धाडसत्रात तब्बल २ कोटी २९ लाखांचा मोहा दारूसाठा जप्त करून नष्ट करण्यात आला. तर १३२ जणांवर १२६ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन सर्जिकल स्ट्राईकची योजना आखली.
 
 
 

wardha-liquor-surgical-strike 
 (संग्रहित छायाचित्र इंटरनेटवरून साभार)
 
 
wardha-liquor-surgical-strike जिल्ह्यातील अवैध दारूविक्रेते मोठ्या प्रमाणात दारू गाळून त्याचा साठा करून ठेवत असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे मागील पाच ते सहा दिवसांपासून दारू भट्ट्यांच्या ठिकाणी, शहरालगतचा परिसर, गावाबाहेरचा परिसर, जंगल शिवारात लक्ष केंद्रीत केले. wardha-liquor-surgical-strike पोलिस अधीक्षक अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील ४ उपविभागीय पोलिस अधिकारी, १९ ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा व इतर शाखांचे असे एकूण ३७० पोलिस अंमलदार यांची १९ ठाण्यात वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. पहाटे ४ वाजतापासून या सर्व गावठी दारूभट्टीवर एकाच वेळी छापा टाकला. या कारवाईत १३२ जणांवर १२६ गुन्हे दाखल करण्यात आले.
 
 
wardha-liquor-surgical-strike तब्बल २ कोटी २९ लाखांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. अचानक केलेल्या वॉशआउट मोहिमेमुळे अवैध दारू तयार करणारे, पुरवठादार आणि विक्रेते यांचे धाबे दणाणले आहेत. जिल्ह्यात अवैध दारूचे कोणतेही प्रकार चालणार नाहीत. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि दारू विक्रेत्यांकडून कोणताही व्यत्यय येऊ नये, म्हणून अशा प्रकारची अचानक कारवाई करण्यात आल्याचे सांगितले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0