जिल्हास्तरावर दिव्यांगांसाठी विविध योजना सुरू करणार : डॉ. भोयर

10 Jan 2026 19:35:15
वर्धा, 
 
 
wardha-pankaj-bhoyar-divyang दिव्यांगांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतून ५ टके निधी दिव्यांगासाठी खर्च झाला पाहिजे, ही मोहीम शासनाने हाती घेतली आहे. जिल्ह्यात निधी खर्च करण्याचे योग्य नियोजन सुरू असून जिल्हास्तरावर दिव्यांगांसाठी विविध योजना सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
 
 

wardha-pankaj-bhoyar-divyang 
 
 
wardha-pankaj-bhoyar-divyang जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात समाज कल्याण विभागामार्फत जिपच्या सेसफंड योजनेतून अस्थिव्यंग दिव्यांगांना देण्यात येणार्‍या स्कुटीची पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अतिरित मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, मुख्य वित्त व लेखाधिकारी मनोज पाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनीषा कुरसुंगे, दिव्यांग कल्याण समितीचे अध्यक्ष संजय जाधव, गिमा टेसटाईलचे शकील पठाण यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
 
 
wardha-pankaj-bhoyar-divyang पालकमंत्री डॉ. भोयर पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यांग कल्याण हा स्वतंत्र विभाग सुरू केला. जिपच्या सेस फंडातून दिव्यांगांना रोजगार व नोकरीवर जाण्यासाठी ईलेट्रिक स्कुटी दिल्या पाहिजे हा आमचा मानस होता. वर्धा निरामय कार्यक्रमात जिल्ह्यातील ९२ विद्यार्थ्यांना किसान विकास पत्राचे वाटप करण्यात आले. दिव्यांग वर, वधू विवाहाला प्रोत्साहन अनुदान देण्यात येते. गोरगरीब, गरजू व्यतींना कशी मदत करता येईल, यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
wardha-pankaj-bhoyar-divyang यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण म्हणाले, जिपच्या ५ टके निधीतून दिव्यांगांना मदत करण्यासाठी इयत्ता पाचवी ते १० मध्ये शिकणार्‍या दिव्यांग विद्यार्थिनींना किसान विकास पत्र देण्यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मान्यता दिली. आज स्कुटी वितरणाच्या लकी ड्रॉ मध्ये स्कुटी न मिळालेल्या उर्वरित लाभार्थ्याना सुद्धा दुसर्‍या टप्प्यात देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
wardha-pankaj-bhoyar-divyang समाज कल्याण विभागामार्फत अस्थिव्यंग असणार्‍या दिव्यांगांना स्कुटी वाटपासाठी अर्ज मागविण्यात आले होते. अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या नावाची ईश्वर चिठ्ठीव्दारे सोडत करण्यात आली. यावेळी गिमा टेसटाईल कंपनीमार्फत सीएसआर फंडातून अंगणवाडी पर्यवेक्षकासाठी ७० लॅपटॉप उपलब्ध करुन दिल्याबद्दल गीमाटेसचे उपाध्यक्ष शकील पठाण यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0