तभा वृत्तसेवा यवतमाळ,
Yavatmal labor issues, विभागातील कामगारांचे प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले होते. काही प्रश्नांची सोडवणूक करून अनेक महत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून प्रशासन वेळकाढू धोरण राबवत आहे. यात महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे कामगार संघटना आक्रमक झाली असून कामगार प्रश्नांवर सोमवारी, 12 जानेवारीपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
यवतमाळ विभागात एसटी कर्मचाèयांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कामगार संघटनेने हे मुद्दे प्रशासनाच्या निदर्शनास आणले होते. प्रशासनाने हे प्रश्न आश्वासन दिले होते. यामुळे संघटनेने त्यावेळी उपोषण स्थगित केले होते. परंतु यातील अनेक प्रश्न प्रलबिंत आहेत. याशिवाय इतर ज्वलंत प्रश्नांंकडे प्रशासनाची डोळेझाक करीत असल्याचा आरोप कामगार संघटनेचा आहे.याच मुद्यावर प्रशासन आणि संघटनेची शुक्रवारी 9 जानेवारीला बैठक झाली. बैठकीत चर्चा फिस्कटल्याने महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना सोमवार, 12 जानेवारीपासून बेमुदत उपोषणावर ठाम आहे. यात रोजंदारीवर असलेल्या चालक कम वाहकांना समयवेतन श्रेेणीचे आदेश काढावे, प्रोत्साहन भत्ता काढावा तसेच भत्ता न काढणाèयांवर कारवाई करण्यात यावी, चालक, वाहक तसेच यांत्रिक विश्रांंतीगृह सुस्थितीत करून सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, रात्रवस्तीस जाणाèया चालक वाहकांना विश्रांंतीगृहांची सोय देण्यात यावी. यासह अनेक प्रश्नावर कामगार संघटनेने बेमुदत उपोषणाचा नोटीस एसटी प्रशासनाला महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे विभागीय सचिव राहुल धार्मिक यांनी दिली.