बाल वैज्ञानिक भविष्याची गुंतवणूक, त्यांना चालना देण्याची गरज : भोयर

10 Jan 2026 16:26:15
वर्धा,
scientists देशातील अनेक वैज्ञानिकांनी नवनवीन इनोव्हेटीव्ह समोर आणून देशाचे नावलौकिक केले आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी मिळाली पाहिजे, यासाठी बाल वैज्ञानिक प्रदर्शनी उपयुत ठरत आहे. बाल वैज्ञानिक भविष्याची गुंतवणूक असून त्यांना चालना देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
 
 

bal vaidhyanik 
 
 
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत जे. बी. सायन्स महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित ५३ व्या जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनीचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, शिक्षा मंडल संस्थेचे अध्यक्ष संजय भार्गव, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे, शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये, प्राचार्य डॉ. प्रदीप टेकाडे, उपशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर पानसरे, रुपेश कांबळे यांची उपस्थिती होती.
विज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे, यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. शिक्षण विभागाचा कार्यभार स्विकारल्यानंतर राज्यस्तरावरील विज्ञान प्रदर्शनीच्या बक्षीस रकमेत वाढ करण्याच्या सूचना दिल्या. फत बक्षीस देवून चालणार नाही तर त्यांना अधिक ऊर्जा देण्याची गरज आहे. तालुका स्तरावरील विजेत्यांना नागपूर येथील सी. व्ही. रमन सायन्स सेंटर, जिल्हास्तरावरील विजेत्यांना इस्त्रो येथे तर राज्यस्तरीय विजेत्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायन्स सेंटरला नेण्याची तरतूद येणार्‍या काळात करण्यात येणार असल्याचे डॉ. भोयर यांनी सांगितले. शिक्षण, विज्ञान, समाजकारण, राजकारण असे अनेक क्षेत्र करियर घडविण्यासाठी उपलब्ध आहे. ज्या कोणत्याही क्षेत्रात आपण काम करू तेथे उत्तमपणे काम करावे. मी ज्या शाळेत शिक्षण घेतले तेथेच मला येऊन विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी सोमण म्हणाले, वैज्ञानिक विचारांना प्रेरणा मिळावी, यादृष्टीने वैज्ञानिक प्रदर्शनी उपयुत आहे. चिकित्सक बुद्धी व नजर पारखी ठेवून नवनवीन कल्पना करून विचार करण्याची क्षमता वाढवा, असे ते म्हणाले. संजय भार्गव म्हणाले, मागील पाच वर्षांपासून जिल्ह्यातील इतर शाळांसोबत मिळून विज्ञान कार्यक्रम राबवित आहे.scientists देशाला पुढे जाण्यासाठी विज्ञानावर संशोधनाची गरज असून शिक्षण व विज्ञान यांना एकत्रित जोड देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री डॉ. भोयर व मान्यवरांनी बाल वैज्ञानिक प्रदर्शनीची पाहणी केली. संचालन मिनल गिरडकर यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. प्रदीप टेकाडे यांनी मानले. यावेळी जिल्हाभरातून आलेले बालवैज्ञानिक, विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0