भरधाव टिप्परची दुचाकीला धडक

11 Jan 2026 18:28:28
कारंजा लाड,
Accident अमरावती मार्गावरील विळेगाव फाट्याजवळ भरधाव टिप्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना आज, ११ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली. वैशाली नितीन गावंडे (वय ५०) असे मृतक पत्नीचे नाव आहे. तर नितीन भाऊराव गावंडे (वय ५५) असे गंभीर जखमी झालेल्या पतीचे नाव आहे.
 

Accident, Truck hits motorcycle 
अकोला जिल्ह्यातील भेंडगाव येथील गावंडे दांपत्य एमएच ३० झेड ३१६१ क्रमांकाच्या दुचाकीने खेर्डा मार्गे अमरावतीकडे जात असताना हा अपघात घडला. टिप्परच्या धडकेमुळे दुचाकी रस्त्यावर फरफटत गेली. त्यामध्ये पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पती गंभीर जखमी झाले. अपघातानंतर रुग्णवाहिका चालक शुभम खोंड यांनी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने त्वरीत जखमीना कामरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीअंती पत्नीला मृत घोषित केले. तर प्राथमिक उपचारानंतर पतीची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती येथे हलविण्यात आले. घटनेची नोंद कामरगाव पोलिस चौकीत करण्यात आली असून, अपघातास कारणीभूत टिप्पर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ठाणेदार भारत लसंते यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि गणेश शिंदे पुढील तपास करीत
Powered By Sangraha 9.0