अनिल कांबळे
नागपूर,
sand smuggling ED raid नवी दिल्ली आणि मुंबईतील ईडी पथकाने मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील वाळू मािफयांवर छापे घातले. अनेक वाळू तस्करांच्या घरातून महत्वपूर्ण दस्तावेज आणि माेठी रक्कम जप्त केल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली.
ईडीच्या पथकाने शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजतापासूनच भाेपाळ आणि नागपूर जिल्ह्यातील वाळू मािफयांच्या घरावर छापेमारी केली. 2021 मध्ये मध्यप्रदेशातून नागपुरात शासनाचा महसूल बुडवून तस्करी केल्या जात हाेती. तसेच वाळू मािफया मनी लाँड्रींग करुन पैशाचा व्यवहार करीत हाेते. या संदर्भात सदर पाेलिस ठाण्यात गुन्हेसुद्धा दाखल आहेत. मध्यप्रदेशातील सर्वात माेठा वाळू मािफयाला अटक करण्यात आली हाेती. ईडीने नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी, रामपुरी, खापा आणि सावनेरमध्ये वाळू मािफयांच्या घरावर छापे टाकले हाेते. यात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे आणि यांचा भाऊ प्रुल्ल कापसे यांचाही समावेश हाेता. वाळू तस्करी आणि मनी लाँड्रींग प्रकरणात ही छापेमारी झाल्याची माहिती समाेर आली आहे. तसेच सावनेरमध्ये विनाेद गुप्ता, लक्ष्मीकांत सातपुते, दादू काेलते, प्रुल्ल कापसे यांच्यावर कारवाई केली. तसेच पाटणसावंगीमध्ये शरद राॅय आणि मनाेज गायकवाड यांच्या घरावर आणि दुकानावर छापे घातल्या गेले. खापा येथील अमित राॅय यांच्या घरावर ईडीने कारवाई केली. यांच्या घरातून महत्वाचे दस्तावेज आणि काही रक्कम ईडीने जप्त केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.