४१.७ ग्रॅम एमडी पकडले

11 Jan 2026 18:59:10
वर्धा,
Ramnagar police गोपनीय माहितीच्या आधारे रामनगर पोलिसांच्या चमूने रविवार ११ जानेवारी रोजी स्थानिक धुनिवाले मठ परिसरात दोघांवर कारवाई करून तब्बल ४१.७ ग्रॅम एमडी पकडले. या प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Ramnagar police  
या प्रकरणातील आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे.एमडीची मोठी उलाढाल होणार असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक दादाजी धुनिवाले मठ परिसरात वेट अ‍ॅण्ड वॉच करून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळील साहित्याची पाहणी पोलिसांनी केली असता मोठ्या प्रमाणात एमडी आढळले. या कारवाईत पोलिसांनी २ लाख ५ हजार ३५० रुपये किंमतीचे ४१.७ ग्रॅम एमडी, तीन मोबाईल व इतर साहित्य असा २ लाख २८ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शिवाय एमडी तस्कर शुद्धदोत माटे रा. नागसेननगर नालवाडी व गिरीपेठ भागातील रहिवासी एका अल्पवयीन मुलीस ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलिस निरीक्षक टाले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक टोपले, अविनाश बन्सोड, नितेश वैद्य, मुकेश वांदिले, मनोज भोमले, भुषण दांडेकर, विकी आणेराव, कुंदा तुरक यांनी केली.
Powered By Sangraha 9.0