तभा वृत्तसेवा
आर्णी,
Arni Np elections आर्णी नगर परिषदेसाठी स्वीकृत सदस्य व उपाध्यक्ष पदाच्या निवडीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत. सोमवार, 12 जानेवारी रोजी दुपारी नगरपरिषदेच्या सभागृहात पहिली सर्वसाधारण सभा होत असून, या निवडीच्या अनुषंगाने सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी मोर्चेबांधणीला वेग आला आहे.
नप अध्यक्षपदी काँग्रेसचे नालंदा भरणे विजयी झाले आहेत. तर 22 सदस्य संख्या असलेल्या नपत कांग्रेस 8, राष्ट्रवादी काँग्रेस (अप) 8, शिवसेना शिंदे 4, भाजपा 1, शिवसेना उबाठा 1 असे पक्षीय बलाबल आहे. कोणत्याही एका पक्षाला बहुमत नसल्यामुळे आर्णी नप त्रिशंकु झाली आहे. काँग्रेसचा नप अध्यक्ष निवडून आला. परंतु त्यांना सभागृहात बहुमत मिळाले नाही. बहुमतासाठी 12 नगरसेवक हवे आहेत.
निवडणूक झाल्यावर काँग्रेस आणि शिवसेना शिंदे यांची युती होईल, अशा वावड्या उठत होत्या. परंतु गुरूवारी व त्यापूर्वी राजकिय सारीपाटावर मोठी उलथापालथ होत राज्यात महायुती आहे त्याच धर्तीवर आर्णी नगरपरिषदेत महायुती झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग, शिवसेना शिंदेचे जिल्हाप्रमुख राजूदास जाधव व भाजपाच्या नेत्यांनी पत्रपरिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस (अप), शिवसेना शिंदे व भाजपाची युती झाली असून यासोबत शिवसेना उबाठाचेही 1 नगरसेवक सहभागी झाले आहेत. त्यामुळे युतीची सदस्य संख्या 14 झाली आहे.
नपत उपाध्यक्ष Arni Np elections हा शिवसेना शिंदेचा तर स्विकृत सदस्य हा राष्ट्रवादी काँग्रेस अपचा असेल. समन्वय समिती स्थापन करून स्थायी समिती व विषय समित्यांविषयी समिती निर्णय घेईल असे सांगितले होते. महाविकास आघाडीकडे 8 नगरसेवक व नप अध्यक्ष धरून 9 चे बलाबल होत आहे. 9 सदस्य असल्यामुळे त्यांचा एक स्वीकृत सदस्य होणार आहे.
उपाध्यक्षपद शिवसेना शिंदेकडे गेले असून, या पदासाठी सध्या नावे निश्चित झाली नाही. 4 पैकी कोणाचीही उपाध्यक्षपदी निवड होऊ शकते, असे राजूदास जाधव यांनी सांगितले. तरी यासाठी अनुभवाच्या जोरावर माजी पाणीपुरवठा समिती सभापती नीलेश गावंडे यांचे नाव चर्चेत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वीकृत सदस्यासाठी बतूल अमिन सोलंकी, सत्यजित गायकवाड, साजिद बेग, संदीप पवार, सादिक शेख, नीलेश जाधव यांनी यवतमाळात नाव दिले आहे. तर काँग्रेसकडून संजय देशमुख, डॉ. नाहिद आरिज बेग, रवी नालमवार, दीपक देवतळे अशी नावे आहेत. उपाध्यक्षाकरीता मुख्याधिकाèयांकडे सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात येणार आहे. उपाध्यक्ष निवडणूक करीता हात उंचावून मतदान होणार आहे. स्वीकृत सदस्य निवडीसाठी जिल्हाधिकाèयांनी छानणी केलेल्या नामनिर्देशन पत्रानुसार, गटनेत्याच्या शिफारशीप्रमाणे दोन सदस्यांची तौलनिक संख्याबळ विचारात घेऊन निवड होणार आहे, असे मुख्याधिकारी रवींद्र राऊत यांनी सांगितले.