‘त्या’ प्रकरणाशी शिक्षक पतसंस्थेचा काहीच संबंध नाही

11 Jan 2026 20:33:40
तभा वृत्तसेवा
दिग्रस, 
digras-news : जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था ही शिक्षकांची आहे. एखाद्या शिक्षक पतसंस्थेकडून कर्ज उचलतो तेव्हा त्याला पतसंस्थेच्या अटी शर्ती मान्य असतात. मात्र त्याने तो खर्च कसा करायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तीक विषय आहे. गिरीष दुधे हा पतसंस्थेचा केवळ एक सभासद होता. त्याने काही रक्कम ‘ग्रो कॅपिटल’ कंपनीत टाकली, त्याच्या सांगण्यावरुन अनेक शिक्षक फसले. या संपूर्ण प्रकरणाशी पतसंस्थेचा काडीचाही संबंध नाही. जर पतसंस्थेविषयी समाजमाध्यमांवर चुकीचे संदेश प्रसिद्ध होत असेल तर ती एक केवळ अफवाच आहे, यावर विश्वास ठेवू नये, असा खुलासा जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्थेद्वारे आयोजित पत्रपरिषदेत करण्यात आला.
 
 
 
y11Jan-Patsanstha
 
 
 
येथील जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सर्व संचालक मंडळांनी रविवार, 11 जानेवारीला पत्रकार परिषदेचे आयोजन करून पतसंस्थेच्या व्यवहाराबाबत जाहीर खुलासा केला. पतसंस्थेचे संचालक एकनाथ मोगले यांच्या विरोधातील चुकीची तक्रार असल्याचे सांगून ही पतसंस्थेची बदनामीच आहे. याबाबतही आम्ही तक्रार दिल्याचे स्पष्ट सांगण्यात आले. पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे सर्व संचालकांनी उपस्थित राहून पत्रकारांच्या माध्यमातून ठेवीदारांना पतसंस्थेची बाजू पटवून दिली.
Powered By Sangraha 9.0