नागपूर,
Jivhala Awards ceremony नागपूरमध्ये आयोजित जिव्हाळा पुरस्कार वितरण सोहळ्यात संघप्रचारकांशी संवाद साधला गेला. यावेळी संघशताब्दी निमित्त पद्मश्री डॉ. धनंजय सखदेव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहप्रचारक प्रमुख सुनील कुलकर्णी, अखिल भारतीय सह संपर्कप्रमुख व विवेकानंद केंद्राचे कोषाध्यक्ष प्रवीण दाभोळकर, तसेच ज्येष्ठ प्रचारक रवींद्र भुसारी आणि सुनील जी देशपांडे यांनी आपले विचार मांडले.
प्रचारकांचे काम किती कठीण असते, हे त्यांच्या मुलाखतीतून स्पष्ट झाले. सर्व प्रचारक आपल्या जवळच्या लोकांसह हॉल भरून उपस्थित होते. त्यांनी प्रचारकांच्या कार्याची माहिती दिली आणि सांगितले की, कोणत्याही फळाची अपेक्षा न करता प्रचारक राष्ट्राच्या उभारणीसाठी झटत असतो. संघाची शिकवण “मानव सेवा हीच धर्म” या तत्त्वावर आधारित असते. Jivhala Awards ceremony या कार्यक्रमाचे आयोजन जिव्हाळा परिवाराचे आशुतोष फडणवीस यांनी केले.
सौजन्य: अभय चोरघडे, संपर्क मित्र