'या' राज्यात संकटाचे सावट मिळाला कडक इशारा!

11 Jan 2026 12:29:35
नागपूर,
maharashtra cold wave weather राज्यातील हवामान सध्या अस्थिर स्थितीत असून नागरिकांना थंडीत बदल अनुभवायला मिळत आहे. कधी थंडी तर कधी पावसाच्या रूपात वातावरण बदलत आहे, ज्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. विशेषत: वायू प्रदूषण वाढल्याने श्वसनसंबंधी समस्यांमध्येही वाढ झाली आहे.
 

maharashtra cold wave weather warning-nagpur-january-2026 
भारतीय हवामान विभागाच्या maharashtra cold wave weather अंदाजानुसार, उत्तरेकडे कडाक्याची थंडी सुरू असून पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये पारा सतत घसरत आहे. मात्र, राज्यात येणाऱ्या थंड लहरी तुलनेने कमी असल्याने नागरिकांना फारसा गारठा जाणवत नाही. तरीही, 1 तारखेला झालेल्या पावसामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. हवामान खात्याचे म्हणणे आहे की, जानेवारी महिन्यात राज्यात थंडी कायम राहण्याची शक्यता आहे.शहरांतील किमान तापमानात मोठी घट नोंदविण्यात आली आहे. मागील तीन दिवसांपासून किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली राहिले आहे, तर काही ठिकाणी तापमान 5 अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले आहे. धुळ्यात 6 अंश, परभणीमध्ये 6.4 अंश, जळगाव, मालेगाव, नाशिक, गोदिंया, भंडारा आणि नागपूरमध्ये सुमारे 10 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. या तापमानात चढउतार असूनही राज्यात गारठा कायम राहणार आहे.भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे, मात्र बंगालच्या उपसागरात पुढील 72 तासांत तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल, ज्यामुळे तामिळनाडूसह दक्षिण भारतातील पाच राज्यांमध्ये जोरदार वारा आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.हवामानातील चढउतार,maharashtra cold wave weather  थंडी आणि पावसामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, विशेषत: वृद्ध, लहान मुले आणि आजारी लोकांनी थंडीत अधिक काळ बाहेर न राहणे, गरम कपडे वापरणे आणि आरोग्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
Powered By Sangraha 9.0