नाल्यात दुचाकी काेसळून एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

11 Jan 2026 18:57:26
अनिल कांबळे्
नागपूर,
Saurabh Arun Dambhare अतिवेगात दुचाकी चालवत असताना वळण घेताना वाहनावरचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीसह दाेघे नाल्यात काेसळले. दाेघांपैकी एकाचा गंभीर जखमी हाेऊन जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीररित्या जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. हिंगणा पाेलिस हद्दीतील उकळी मार्गावरच्या नाल्यावर शनिवारी सायंकाळी सात वाजता हा विचित्र अपघात घडला.
 

Nagpur, Hingna, Saurabh Arun Dambhare 
साैरभ अरुण डंभारे (24) रा. कटरे लेआऊट, जागेश्वरपूरी हिंगणा असे दुचाकीसह नाल्यात पडून दगावलेल्या तरुणाचे नाव आहे. तेजस धनराज मरसकाेल्हे (23) असे जखमीचे नाव आहे. साैरभ हा शनिवारी सायंकाळी मित्र तेजस मरसकाेल्हे याला साेबत घेऊन दुचाकीने घरी परत येत हाेते. दुचाकी अतिवेगाने चालवित असताना पुलावरील वळणमार्ग दिसला नाही. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हे दाेघेही वाहनासह नाल्यात पडले. रस्त्यावरून ये-जा करणाèयांनी हा अपघात घडताना बघितला. त्यामुळे दाेघांनाही तातडीने नाल्यातून बाहेर काढत हिंगणा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात पाेचताच साैरभ यांना डाॅक्टरांनी तपासून मृत घाेषित केले. गंभीर दुखापती झाल्याने तेजस मरसकाेल्हे यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अरुण डंभारेची बहिण शिवानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगणा पाेलिसांनी आकस्मात मृत्यूची नाेंद केली.
Powered By Sangraha 9.0