पूजा खेडकरचा धक्कादायक आरोप; घरकामगाराने नशा देऊन चोरी केल्याचा दावा

11 Jan 2026 17:00:32
पुणे,  
pooja-khedkar पुणे पोलिसांनी माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर हिने केलेल्या गंभीर आरोपानंतर प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. पूजा खेडकरने तिच्या घरात काम करणाऱ्या एका घरगुती सहायिकेने तिला आणि तिच्या आई-वडिलांना बेशुद्ध करून घरातील मौल्यवान वस्तू चोरून नेल्याचा दावा केला आहे. ही कथित घटना पुण्यातील बाणेर रोडवरील तिच्या बंगल्यात घडल्याचे सांगण्यात येत आहे.
 
pooja-khedkar
 
वृत्तसंस्था पीटीआयनुसार, पूजा खेडकरने शनिवारी उशिरा पोलिसांशी संपर्क साधला. तिने सांगितले की नुकतीच ठेवलेली घरगुती सहायिका, जी मूळची नेपाळची असल्याचा संशय आहे, तिने अन्न किंवा पेयामध्ये नशेचे द्रव्य मिसळले. यामुळे पूजा खेडकर तसेच तिचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर तिघेही बेशुद्ध झाली. pooja-khedkar पूजा खेडकरच्या आरोपानुसार, तिघे बेशुद्ध झाल्यानंतर त्या सहायिकेने त्यांना बांधून ठेवले आणि मोबाईल फोनसह इतर मौल्यवान वस्तू घेऊन पळ काढला. काही वेळानंतर आम्ही स्वतःला सोडवण्यात यशस्वी झालो आणि दुसऱ्या फोनवरून पोलिसांना माहिती दिल्याचेही  तिने सांगितले.
पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की सध्या ही तक्रार तोंडी स्वरूपात नोंदवण्यात आली असून अद्याप लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. तसेच कथित चोरीला गेलेल्या वस्तूंची सविस्तर यादीही अद्याप पोलिसांकडे देण्यात आलेली नाही. तरीही पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून घटनेशी संबंधित सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. लेखी तक्रार मिळाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असेही पोलिसांनी सांगितले. pooja-khedkar दरम्यान, खेडकर कुटुंब यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. गेल्या वर्षी नवी मुंबईतील रोड रेज प्रकरणानंतर दिलीप आणि मनोरमा खेडकर यांच्याविरोधात एका ट्रक चालकाच्या कथित अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. याशिवाय, पूजा खेडकरवर २०२२ च्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी चुकीची माहिती दिल्याचे आरोपही झाले होता, मात्र हे आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत.
Powered By Sangraha 9.0