रामकृष्ण वाघ महाविद्यालयाचा करिअर कट्टात गौरव !

11 Jan 2026 12:39:07
नागपूर,
Ramkrishna Wagh College महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र व शारदाबाई पवार आर्ट्स अँड कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात बोखारा येथील रामकृष्ण वाघ महाविद्यालयास करिअर कट्टा उपक्रमा अंतर्गत ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून सन्मानित करण्यात आले.या समारंभात प्रा. विद्या गजभिये व प्रा. पदमा वाळके यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर तसेच करिअर कट्टाचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांच्या हस्ते सन्मान स्वीकारला.
 
 
sayali
 
 
ग्रामीण विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने राबविण्यात आलेल्या करिअर कट्टा उपक्रमाला मिळालेले हे मानांकन उल्लेखनीय असल्याचे मान्यवरांनी नमूद केलेया उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे, आमदार मोनिका राजळे, सचिव नितीन शिंदे, विश्वस्त राहुल दादा राजळे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष शिवाजी राजडे Ramkrishna Wagh College तसेच सर्व संचालक मंडळ यांनी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. मारोती वाघ, संचालिका लता वाघ, प्रभारी प्राचार्य प्रा. पंकज झगडे, सर्व विभागप्रमुख, करिअर कट्टा समन्वयक प्रा. सायली लाखे पिदळी, प्रा. किरण पांडे, प्रा. विद्या गजभिये, प्रा. पदमा वाळके व करिअर संसदेचे अभिनंदन केले.
सौजन्य: प्रा. सायली लाखे पिदळी,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0