आरटीईसाठी शाळांची नोंदणी सुरू

11 Jan 2026 19:35:06
वर्धा,

RTE registration आरटीई अंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळांत दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना २५ टके मोफत प्रवेश दिला जातो. याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून ९ जानेवारीपासून जिल्ह्यातील शाळांची आरटीई प्रवेशाकरिता नोंदणी करण्यास सुरूवात झाली आहे. १९ जानेवारीपर्यंत शाळांची नोंदणी केली जाणार आहे.
 

 RTE registration 
मागील शैक्षणिक वर्षात आरटीईसाठी जिल्ह्यातील ११४ शाळांची नोंदणी केली होती. या शाळांमध्ये आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेशही देण्यात आला. तर शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता आरटीई २५ टके प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या अनुषंगाने ९ जानेवारीपासून विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यीत शाळांची नोंदणी तसेच शाळांचे व्हेरिफिकेशन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १९ जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
 
 
आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी सध्या शाळांची नोंदणी केली जात आहे. मागीलवर्षी जिल्ह्यातील ११४ शाळांनी नोंदणी केली होती. यंदा शाळांना १९ जानेवारीपर्यंत नोंदणी करायची आहे. त्याअनुषंगाने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकार्‍यांना शाळांची नोंदणी विहित मुदतीत करून घेण्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मागीलवर्षी कुठल्या तालुयात किती शाळांची नोंदणी
 
 
आर्वी : १२
आष्टी : ०४
देवळी : १३
हिंगणघाट : १८
कारंजा : ०६
समुद्रपूर : ०६
सेलू : १२
वर्धा : ४३
Powered By Sangraha 9.0