चंद्रपूर,
Tadoba Andhari Tiger Reserve, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील चिंचोली गावाजवळील इरई नदीच्या काठावर रविवार, 11 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास एका तीन वर्षीय वाघाचा मृतदेह तरंगताना आढळला. 2 ते 3 दिवसांपूर्वीच वाघाचा मृत्यू झाला असावा असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
चंद्रपूर शहराजवळ असलेल्या चिंचोली गावाजवळून वाहणार्या इरई नदीच्या काठावर काही गावकर्यांना वाघाचा मृतदेह दिसला. या बाबतची माहिती त्यांनी वनविभागाला दिली. माहिती कळताच वनपरिक्षेत्र अधिकारी कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल झाले झाले. वनविभागाच्या कर्मचार्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तासणीकरिता ‘ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर’ला रवाना केला. उत्तरीय तपासणीनंतर वाघाचा मृत्यू हा घातपात की, अपघात याचा खुलासा होणार आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी चिंचोली गावात गेडाम (65) यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले होते. घटनेनंतर वनविभागाची चमू उशिरा आल्याने गावकर्यांचा वनविभागावर रोष उफाळून आला होता. त्यानंतर आता वाघाचा मृतदेह आढळला.