ट्रम्प यांच्या अमेरिकेत नवीन दहशत, गुलाबी कोकेन; सेवन केल्यावर शरीर होते निळे

11 Jan 2026 15:33:45
वॉशिंग्टन,  
pink-cocaine-in-america अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमली पदार्थांविरोधात कठोर मोहीम सुरू आहे. कॅरिबियन समुद्रात ड्रग्ज वाहून नेणाऱ्या बोटींवर कारवाई, व्हेनेझुएलासारख्या देशांवर लष्करी ऑपरेशन्स आणि मोठ्या प्रमाणावर जप्त्या करण्यात येत आहेत. मात्र, या सगळ्या उपाययोजनांनंतरही अमेरिकेत एक नवे आणि अतिशय धोकादायक अमली पदार्थ वेगाने पाय पसरत आहे. ‘पिंक कोकीन’ किंवा ‘तुसी (Tuci)’ म्हणून ओळखला जाणारा हा ड्रग आता क्लब, पार्ट्या आणि तरुणांमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत आहे.
 
pink-cocaine-in-america
 
ताज्या अहवालानुसार, पिंक कोकीन आता केवळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर ग्रामीण भागातही पोहोचला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आणि सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे नावात ‘कोकीन’ असले तरी प्रत्यक्षात हा पदार्थ कोकीन नाही. तो विविध अमली पदार्थांचा घातक कॉकटेल आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या मिश्रणात प्रामुख्याने केटामाइन आणि एमडीएमए (एक्स्टसी) असते. pink-cocaine-in-america अनेक वेळा त्यात मेथामफेटामाइन, ओपिओइड्स आणि फेंटानिलसारखे अतिशय घातक घटकही आढळतात. आकर्षक दिसावे यासाठी त्यात गुलाबी फूड कलरिंग मिसळले जाते. प्रत्येक बॅच वेगळा असल्याने त्याचा परिणामही वेगवेगळा असतो—कधी सौम्य, तर कधी थेट जीवघेणा. ओव्हरडोज झाल्यास श्वासोच्छवास थांबणे, हृदयाचे ठोके बिघडणे आणि शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊन त्वचा निळसर पडण्यासारखी (सायनोसिस) गंभीर स्थिती उद्भवू शकते.
अलिकडच्या काळात लॉस एंजेलिस, मियामी, न्यूयॉर्क आणि कोलोराडो स्प्रिंग्ससारख्या शहरांमध्ये पिंक कोकीनविरोधात छापे टाकण्यात आले असून नागरिकांसाठी इशारे जारी करण्यात आले आहेत. 2025 मध्ये न्यूयॉर्कमध्ये एका तस्करी प्रकरणात पिंक कोकीनसोबत अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली होती. pink-cocaine-in-america अहवालानुसार, सप्टेंबर 2020 ते जुलै 2024 या कालावधीत अनेक मृत्यू या ड्रगशी संबंधित असल्याचे आढळले आहे. 2024 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत चार राज्यांमध्ये किमान 18 प्रकरणे नोंदवली गेली असून, बहुतेकांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या ड्रगची सुरुवात कोलंबियामध्ये झाल्याचे मानले जाते. तेथे क्लब आणि पार्टी ड्रग म्हणून त्याची ओळख निर्माण करण्यात आली. ‘2C’ नावाच्या सायकेडेलिक ड्रगपासून प्रेरणा घेऊन त्याला ‘तुसी’ हे नाव देण्यात आले आणि गुलाबी रंगालाच ब्रँडिंग बनवण्यात आले. हळूहळू हा प्रकार लॅटिन अमेरिका, त्यानंतर अमेरिका आणि युरोपमध्ये पसरला. तज्ज्ञांच्या मते, पिंक कोकीन आता केवळ एक ड्रग न राहता एक ‘कॉन्सेप्ट’ बनला आहे. तस्करांना ठरावीक कच्च्या मालाची गरज नसते; जे नशेचे पदार्थ उपलब्ध असतील ते एकत्र करून नवा बॅच तयार केला जातो.
सर्वात गंभीर बाब म्हणजे या ड्रगसाठी कोणताही ठोस उपचार किंवा अँटीडोट उपलब्ध नाही. डॉक्टर आणि आपत्कालीन वैद्यकीय पथके फक्त आधारात्मक उपचार देऊ शकतात, तोपर्यंत नशेचा परिणाम शरीरातून कमी होईल अशी आशा ठेवावी लागते. अनेक वेळा रुग्णाचा जीव वाचवणे कठीण ठरते. अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की पिंक कोकीनचा धोका आता मोठ्या शहरांपुरता मर्यादित न राहता ग्रामीण अमेरिकेपर्यंत पोहोचला असून, ही बाब भविष्यासाठी अत्यंत चिंताजनक मानली जात आहे.
Powered By Sangraha 9.0