वर्धा,
vb-g-ram-g-congress : मनरेगा बंद करून व्हीबी-जी राम-जी ही योजना सरकारने अंमलात आणली. या योजनेच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने रविवार ११ रोजी स्थानिक सिव्हील लाईन परिसरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही युपीए सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना, जी ग्रामीण भागातील कुटुंबांना वर्षातून १०० दिवसांपर्यंत अकुशल रोजगाराची हमी देते. ज्यामुळे ग्रामीण भागातील उपजीविकेची सुरक्षा वाढते आणि कामाचा अधिकार सुनिश्चित करते. ही योजना कामाचा अधिकार कायद्याद्वारे सामाजिक सुरक्षा प्रदान करते. पण, केंद्र सरकारने एक विधेयक पारित करून युपीए सरकारने २००५ साली सुरू केलेली मनरेगा ही कल्याणकारी योजना बंद करून व्हीबी-जी राम-जी ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच निर्णयाविरोधात हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, डॉ. अभ्युदय मेघे, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, धर्मपाल ताकसांडे, बाळा माऊस्कर, सुनील कोल्हे, अरुणा धोटे, अर्चना सोमवंशी, भाग्यश्री वानखेडे, नरेंद्र मसराम यांनी केले. आंदोलनात सतीश आत्राम, राजीव कंगाले, मंगेश खेडकर, अविनाश इंदुरकर, नंदकुमार वानखेडे, राजू झांबरे, परवेज खान, कन्हैया छांगाणी, प्रशांत तळवेकर, चंद्रशेखर घोडे, अविनाश उबाळे, अक्रम पठाण, सुनील सोमवंशी, आदींची उपस्थिती होती.