तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
yavatmal-news : शेतकèयांना दरवर्षी सोसावा लागणारा फवारणी खर्च आणि भोगाव्या लागणाèया विषबाधा म्हणजे कीटकनाशक उत्पादक आणि सरकारी यंत्रणांचे साटेलोटे आहे, असा स्पष्ट निष्कर्ष शेतकरी संघटनेच्या विज्ञान व तंत्रज्ञान आघाडीने काढला आहे. येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयाच्या औषधशास्त्र विभागाने 2017 ते 2023 दरम्यान भरती झालेल्या 978 फवारणी रुग्णांना स्पर्श व श्वसनावाटे विषबाधा झाल्याचे आणि त्यांना श्वसनावाटेच फवारणी विषबाधा होतात, असे नोंदवले आहे. केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समितीने कीटकनाशक विषबाधा वर्गीकरण सुधारणा करण्याबाबत कीटकनाशक संघटना व इतर संबंधितांचे अभिप्राय 9 ऑगस्ट 2019 च्या जाहीर नोटीसद्वारे मागितले होते.
कीटकनाशक पॅकिंग नोटिसमध्ये नमूद केलेला अत्यंत विषारीपणाचा केशरी रंगाचा त्रिकोण आणि श्वसन विषबाधेचा त्रिकोण उत्पादक छापतच नाहीत, अशी शेतकरी संघटनेची तक्रार आहे. कीटकनाशक सुधारित वर्गीकरणात जहाल विषारी गटात पोट आणि स्पर्श विषारीपणा दर्शविण्यासाठी कीटकनाशक पॅकिंगवरील त्रिकोणाचा रंग गडद लाल असतो. अत्यंत विषारी प्रकारासाठी कीटकनाशक पॅकिंगवरील त्रिकोणाचा रंग केशरी असतो.
तर मध्यम विषारी प्रकारात कीटकनाशक पॅकिंगवरील त्रिकोणाचा रंग गडद पिवळा असतो. सौम्य विषारीसाठी तो त्रिकोण निळा असतो. तसेच किंचित विषारी कीटकनाशक पॅकिंगसाठी त्रिकोणाचा रंग हिरवा असतो. आतापर्यंतचे भारतीय वर्गीकरण पोट व स्पर्श विषारीपणाच्या आधारावर होते. उत्पादनाच्या विषारीपणाचे वर्गीकरण पोट व स्पर्श व्यतिरिक्त जागतिक स्तरावर सुसंवाद प्रणालीच्या श्वसनावाटे विषारीपणा विचारात घेतला पाहिजे, पण तो आपल्याकडे घेतलाच जात नाही, असे शेतकरी संघटना विज्ञान व तंत्रज्ञान आघाडीचे प्रमुख मिलिंद दामले यांनी म्हटले आहे.