कारंजात रंगला आगाशे काकांच्या पायदळ पालखीचा सोहळा

12 Jan 2026 17:34:37
कारंजा लाड,
karanja, Agashe kaka palakhi बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथून निघालेली प.पू. आगाशे काकांची पायदळ पालखी श्री गुरु महाराज नृसिंह सरस्वती स्वामींच्या चरणी ११ जानेवारी रोजी भक्तिभावात दाखल झाली. या पायदळ पालखी सोहळ्यात शेकडो पुरुष व महिला भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
 

karanja, Agashe kaka palakhi 
गेल्या २२ डिसेंबर पासून कारंजा येथे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा सुरू असून, २ फेब्रुवारीला याची सांगता होणार आहे. ८ जानेवारी रोजी खामगाव येथून मार्गक्रमण सुरू केलेल्या या पालखीने विविध गावांतून भक्तीमय वातावरणात प्रवास करत ११ जानेवारी रोजी कारंजा येथे प्रवेश केला. गेल्या तब्बल २३ वर्षांपासून परमपूज्य आगाशे काकांची पायदळ पालखी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी अखंडपणे कारंजा येथे येत असून, ही परंपरा भाविकांसाठी श्रद्धा व भक्तीचे प्रतीक ठरली आहे. पालखी प्रवासादरम्यान सहभागी असलेल्या पुरुष व महिला भक्तांसाठी नाश्ता, चहा व पाण्याची उत्तम व्यवस्था अभय खेडकर यांच्या वतीने करण्यात आली.
तालुयातील तुळजापूर येथे पालखीचे स्वागत खेडकर परिवाराकडून मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले. ठिकठिकाणी भाविकांनी फुलांची उधळण करत पालखीचे दर्शन घेतले. या पायदळ पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. श्री गुरु चरणी अखंड सेवा घडो या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवणारा हा सोहळा भाविकांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरला. श्री गुरुमाऊलीच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर पालखी खामगावकडे मार्गस्थ झाली. या पालखीत जवळपास ५०० भाविक सहभागी आहेत.
Powered By Sangraha 9.0