ट्रम्प यांना धक्का! 27 देशांनी भारताबरोबर घेतला ऐतिहासिक निर्णय

12 Jan 2026 16:14:44
नवी दिल्ली,  
27-countries-agreement-with-india अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या कडक टॅरिफ निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार राजकारणात नवे वादळ उठले आहे. रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवल्याच्या कारणावरून भारतावर आधीच २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ जाहीर करण्यात आला होता. त्यात आता आणखी वाढ होऊन अमेरिकेत भारतीय वस्तूंवर तब्बल ५० टक्के आयात शुल्क आकारले जात आहे. या निर्णयामुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये स्पष्ट तणाव निर्माण झाला आहे.
 
27-countries-agreement-with-india
 
अमेरिकेच्या या धोरणाचा थेट परिणाम भारतीय निर्यातीवर होत असताना, भारताने मात्र पर्यायी बाजारपेठांचा मार्ग स्वीकारला आहे. चीन आणि रशियामध्ये भारताने निर्यात वाढवल्याने या दोन्ही देशांशी भारताची व्यापारी जवळीक अधिक घट्ट होत आहे. हीच बाब आता अमेरिकेसाठी चिंतेचा विषय ठरत असल्याचे आंतरराष्ट्रीय राजनैतिक वर्तुळात बोलले जात आहे. दरम्यान, भारत आणि अमेरिका यांच्यात होऊ घातलेली मोठी व्यापारी करार प्रक्रिया सध्या संथावल्याचे चित्र आहे. या कराराबाबत अपेक्षा मोठ्या होत्या, मात्र सध्या तो ‘थंड बस्त्यात’ गेल्याचे संकेत मिळत आहेत. 27-countries-agreement-with-india पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्याशी थेट संपर्क साधला नाही, त्यामुळेच करार रखडल्याचा आरोपही अमेरिकेकडून अप्रत्यक्षपणे करण्यात आला आहे. यामुळे ट्रम्प यांची नाराजी अधिकच वाढल्याचे मानले जात आहे.
मात्र, अमेरिकेच्या दबावाला प्रत्युत्तर देत भारताने नवी रणनीती आखल्याचे दिसते. अमेरिका-भारत व्यापार करार जरी सध्या प्रलंबित असला, तरी भारत आणि युरोपीय संघ यांच्यात जगातील सर्वात मोठ्या व्यापारी कराराच्या दिशेने निर्णायक पावले टाकली जात आहेत. सध्या २७ देशांचा समावेश असलेल्या युरोपीय संघासोबत भारताचा करार अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, भारताचे वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी ब्रसेल्स येथे युरोपीय संघाच्या वरिष्ठ नेत्यांशी अत्यंत महत्त्वाची बैठक घेतली. 27-countries-agreement-with-india या बैठकीत भारत-युरोपीय संघ व्यापार कराराचे अंतिम स्वरूप, अटी आणि व्यापक परिणाम यावर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेनंतर हा करार आता शेवटच्या टप्प्यात असल्याचे संकेत मिळाले आहेत.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने सुरू केलेल्या ‘टॅरिफ वॉर’चा आंतरराष्ट्रीय व्यापारावर मोठा परिणाम होत असल्याचे स्पष्ट होत आहे. अनेक देशांवर टॅरिफ लादल्याने जागतिक पातळीवर अस्थिरता निर्माण झाली असून, युरोपीय संघही अमेरिकेच्या धोरणांपासून दूर राहून भारतासोबत मजबूत व्यापारी भागीदारी करण्यास उत्सुक असल्याचे चित्र आहे. लवकरच भारत आणि युरोपीय संघामध्ये ऐतिहासिक व्यापारी करार जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असा करार प्रत्यक्षात आला, तर तो जागतिक व्यापाराच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल आणि अमेरिकेसाठीही मोठा राजनैतिक व आर्थिक धक्का मानला जाईल.
Powered By Sangraha 9.0