इस्रोची पहिली मोठी झेप नवीन वर्षात EOS-N1 प्रक्षेपण यशस्वी

12 Jan 2026 10:31:04
श्रीहरिकोटा,
EOS-N1 launch successful इस्रोने सोमवारी, १२ जानेवारी रोजी आणखी एक महत्त्वपूर्ण प्रक्षेपण यशस्वीरित्या पार पडले. देशाचा नवीन पृथ्वी निरीक्षण उपग्रह, EOS-N1 अन्वेषा, PSLV C-62 मोहिमेचा भाग म्हणून श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून अवकाशात सोडला गेला. या उपग्रहामुळे सीमा निरीक्षण, लपलेल्या लक्ष्यांचा शोध आणि पर्यावरणीय देखरेखीमध्ये मोठी सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे. २०२६ मधील इस्रोची ही पहिली उपग्रह मोहिम असून, प्रक्षेपण सकाळी १०:१७ वाजता सतीश धवन अंतराळ केंद्राच्या पहिल्या प्रक्षेपण पॅडवरून केले गेले. या मोहिमेत EOS-N1 अन्वेषा उपग्रहाबरोबरच देशांतर्गत आणि परदेशी ग्राहकांचे १४ इतर सह-प्रवासी पेलोड देखील अवकाशात सोडले गेले. या मोहिमेला इस्रोच्या व्यावसायिक शाखा न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) ने हाताळले.
 

EOS-N1 launch successful
 
मुख्य पेलोड ईओएस-एन१ (अन्वेषा) हा हायपरस्पेक्ट्रल अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह असून, तो सीमा सुरक्षा, लपलेल्या लक्ष्यांचा शोध आणि पर्यावरणीय निरीक्षण यामध्ये क्रांती घडवून आणेल. २०२५ मध्ये झालेल्या अपयशानंतर ही PSLV मोहिम इस्रोसाठी महत्त्वपूर्ण पुनरागमन मानली जात आहे. प्रक्षेपणापूर्वी सर्व तांत्रिक पॅरामीटर्सची तपासणी करण्यात आली, स्वयंचलित क्रमानुसार अंतिम चाचणी पार पडली आणि सकाळी १०:१८:३० वाजता उपग्रह यशस्वीरित्या अवकाशात पोहोचला. यामुळे इस्रोची क्षमता आणि अंतराळ क्षेत्रातील भारतीय कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, तसेच पर्यावरणीय, संरक्षणात्मक आणि संशोधनासाठी देशाला दिव्यदृष्टी प्रदान होईल.
 
 
Powered By Sangraha 9.0