अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

12 Jan 2026 17:19:09
चामोर्शी,
Illegal sand transport, अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जामगिरी येथे जप्त करण्यात आल्याची कारवाई रविवारी सकाळी 8.20 वाजता करण्यात आली. ही कारवाई येणापूरचे मंडळ अधिकारी नवनाथ अतकरे यांनी केली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जामगिरी येथे अवैधरित्या रेती वाहतूक करून मंदिराजवळ खाली करत असताना मारोडा येथील प्रदीप देवाजी बोरकुटे यांची रेतीची ट्रॅक्टर जप्त करण्यात आली.
 

Illegal sand transport, 
ट्रॅक्टर चालक संदीप देवाजी बोरकुटे रा. मारोडा हे वाहन मालक संदीप देवाजी बोरकुटे यांच्या सांगण्यावरून जंगलातील नाल्यामधून अवैध रेती वाहतूक करीत असल्याची माहिती येणापूरचे मंडळ मंडळ अधिकारी अतकरे यांना मिळाली. त्यांनी लगेच ग्राम महसूल अधिकारी तुषार झुरे यांना सोबत घेऊन तत्काळ जामगिरी येथे गेले असता जामगिरी येथील मंदिराजवळ ट्रॅक्टरमधील रेती खाली करतांना आढळून आला. यावेळी वाहन चालकाने पथक पोहचल्या नंतरही जबरदस्तीने रेती खाली केली. सदर घटनेचे व्हिडीओ व फोटो काढण्यात आले. मोक्यावर ट्रॅक्टरचा पंचासमक्ष जप्तीनामा करुन ट्रॅक्टर तहसिल कार्यालय चामोर्शी येथे लावण्यात आले.
Powered By Sangraha 9.0