नवी दिल्ली,
India textile industry, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियातून तेल खरेदी करणाऱ्या देशांच्या आयातीवर ५०० टक्के शुल्क लावण्याचा इशारा दिल्याने भारताच्या वस्त्रोद्योगाला मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. या इशाऱ्याचा सर्वाधिक फटका तामिळनाडूला बसण्याची शक्यता आहे, जिथे देशातील सर्वांत मोठा विणकाम उद्योग केंद्रित आहे.
तमिळनाडूचे अर्थमंत्री India textile industry, थंगम तेन्नरसू यांनी शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या परिस्थितीची गंभीरता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “सध्याची परिस्थिती कायम राहिली तर अंदाजे ३० लाख नोकऱ्यांवर तातडीने गंडांतर येईल. तामिळनाडूमधून भारताच्या २८ टक्के वस्त्रोद्योगाची निर्यात केली जाते आणि ७५ लाखांहून अधिक कामगारांना रोजगार मिळतो. या उद्योगावर ताण आल्यास अनेक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) बंद पडण्याची शक्यता आहे.”
३० टक्के वस्त्र निर्यात
सध्या भारताकडून अमेरिकेत India textile industry, जवळपास ३० टक्के वस्त्र निर्यात होते. आर्थिक वर्ष २०२४-२५ दरम्यान भारताने अमेरिकेत ३७ अब्ज डॉलर किमतीचे वस्त्र आणि कपडे निर्यात केले. विशेषतः तिरुपूरमधील विणकाम उद्योग हा देशातील सर्वात मोठा आहे, जिथून भारतातील सुमारे ९० टक्के विणकाम निर्यात होते. तामिळनाडूतून ३१ टक्के उत्पादन अमेरिकेत जाते, त्यामुळे वाढीव शुल्क लागू झाल्यास तामिळनाडूवर इतर राज्यांच्या तुलनेत गंभीर परिणाम होऊ शकतात.गेल्या वर्षी ऑगस्टपासून अमेरिकेने लादलेल्या ५० टक्के शुल्कामुळे भारतीय निर्यातदारांना आधीच वस्तूंच्या किमतीत कपात करावी लागली, पर्यायी बाजारपेठा शोधाव्या लागल्या तसेच शेजारील देशांमार्फत माल पाठवावा लागला. यामुळे अमेरिकेत भारतीय उत्पादनांच्या किंमती वाढल्या आणि ग्राहकांकडून मागणी कमी झाली.
सध्या हिवाळी हंगामास सुरुवात झाल्यामुळे भारतीय वस्त्र उत्पादक तयारीत असले तरी ट्रम्पच्या ५०० टक्के शुल्काच्या इशाऱ्यामुळे India textile industry, निर्यातीच्या शक्यता आणि उत्पादनक्षमतेवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. निर्यातदारांनी सांगितले की, अमेरिकेतील खरेदीदारांच्या मानसिकतेत तीव्र बदल झाले असून मागील वर्षीच्या शुल्कातून उद्योग अजूनही सावरलेला नाही.तामिळनाडूच्या अर्थमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे त्वरीत हस्तक्षेप करून अमेरिकेशी संभाव्य व्यापार करार लवकरात लवकर करण्याची विनंती केली, अन्यथा राज्यातील रोजगार आणि उद्योगाला मोठा धोका उद्भवेल असे इशारे दिले.