महापालिका निवडणूक 'शिस्तभंग' गैरहजर कर्मचाऱ्यांवर कायदेशीर 'मोठी' कारवाई!

12 Jan 2026 12:01:18
मुंबई,

Mumbai municipal election, महानगरपालिकेच्या प्रशासनातर्फे आगामी १५ जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये गैरहजेरीवर प्रशासनाने कठोर कारवाई सुरू केली आहे. निवडणूक प्रक्रियेत नियुक्त कर्तव्ये पार पाडण्यासाठी बंधनकारक प्रशिक्षण आणि मतदान प्रक्रियेत उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली असतानाही एकूण ६८७१ अधिकारी व कर्मचारी गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आले.
 

Mumbai municipal election, 
या पैकी २३५० अधिकारी Mumbai municipal election, व कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले असले तरी, ४५२१ अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण, मतदान किंवा नेमलेल्या कर्तव्यांवर उपस्थित राहले नाहीत. प्रशासनाने त्यांच्यावर १२ जानेवारीपासून पोलीस कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी याबाबत स्पष्ट केले की, या कारवाईत गुन्हा नोंद, दंडात्मक कारवाई तसेच विभागीय शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येणार आहे.डॉ. जोशी यांनी सांगितले की, निवडणूक ही संविधानिक व कायदेशीर जबाबदारी असून, यामध्ये कसूर करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. त्यामुळे कोणत्याही प्रकारची दिरंगाई, निष्काळजीपणा अथवा प्रशासनाचे आदेश न पाळणे सहन केले जाणार नाही. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेमलेल्या कर्तव्यांचे पालन तत्काळ प्रामाणिकपणे करावे, अन्यथा कायदेशीर व प्रशासकीय कारवाई अटळ आहे.यामध्ये महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसह राष्ट्रीय बँक, बेस्ट, बीएसएनएल, एचपीसीएल, विमा कंपन्या, एलआयसी, म्हाडा, एमटीएनएल, टपाल खाते, रेल्वे, आरसीएफ, नाबार्ड यासारख्या शासकीय व सार्वजनिक उपक्रमांचे कर्मचारी देखील समाविष्ट आहेत.
 
 
महापालिका निवडणूक Mumbai municipal election, प्रक्रियेचा पहिला व दुसरा टप्पा प्रशिक्षण पूर्ण झाले असून, १५ जानेवारी रोजी मतदान व १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या प्रक्रियेसाठी अंदाजे १ कोटी ३४ लाख ४३ हजार ३१५ मतदारांची सेवा आणि मतदानासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्गाची आवश्यकता आहे. तथापि, काही कर्मचाऱ्यांच्या जबाबदारी न पाळल्यामुळे प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावा लागत असल्याचे डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले.निवडणूक प्रक्रिया निर्भय, मुक्त, पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, कोणत्याही प्रकारची ढिलाई अथवा नियमभंग सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी अधोरेखित केले.
Powered By Sangraha 9.0