अनिल कांबळे
नागपूर,
Operation Shakti शाळकरी मुली, महाविद्यालयीन तरुणी आणि महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचा विश्वास निर्माण करण्यात पाेलिसांना यश आले असूननागपूर पाेलिसांच्या विविध अभियानामुळेच शहरात महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. उपराजधानीत महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये तब्बल 33 टक्क्यांनी घट झाली झाली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला गृह विभाग प्राधान्य देऊन सुरक्षित वातावरण निर्माण करेल, असा दावा केला हाेता. शहरात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये माेठी घट झाल्याची आकडेवारी प्रकाशित झाल्यामुळे गृहमंत्र्यांचा दावा सत्यात उतरला आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून पाेलिस आयुक्त डाॅ. सींगल आणि सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी हे सकारात्मक प्रयत्न करीत आहेत. त्यांनी पाेलिस दीदी, निर्भया पथक, मार्शल दुर्गा, दामिनी, ऑपरेशन शक्ती, भराेसा सेल, सामाजिक सुरक्षा पथकाचे विशेष अभियान राबविले. यात शाळकरी मुली आणि महाविद्यालयीन तरुणींना सातत्याने मार्गदर्शन करणे तसेच कार्यशाळा आयाेजित करण्याचे कार्य केले. पाेलिस दीदी उपक्रमांतर्गत शाळकरी मुलींना ‘गुड टच-बॅड टच’याबाबत धडे दिले. यात विविध शैक्षणिक संस्थांना पुढाकार घेण्यास प्राेत्साहन दिले. पाेलिसांनी मार्शल दुर्गा आणि ऑपरेशन शक्ती अभियानाद्वारे तरुणी व महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण करुन दिले. महिला पाेलिसांची गस्त वाढविण्यात आली तर दुचाकीवरुन महिला पाेलिस रस्त्यावर नियमितपणे दिसत आहेत. वर्ष 2024 मध्ये महिलांवरील बलात्काराच्या 272 घटना घडल्या हाेत्या. त्यामध्ये 269 गुन्ह्यांमधील आराेपींना अटक करुन न्यायालयात आराेपपत्र सादर करण्यात आले हाेते. गेल्या 2025 मध्ये 182 बलात्काराच्या घटनांची नाेंद पाेलिसांनी घेतली आहे. त्यापैकी 181 गुन्ह्यात पाेलिसांनी यशस्वीरित्या तपास करुन न्यायालयात आराेपपत्र सादर केले आहे. 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये लैंगिक अत्याचाराचे 33 टक्के गुन्हे कमी झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.
अत्याचारात कुटुंब-नात्यातील आराेपी
विवाहित महिला, विधवा किंवा कुटुंबातील महिलांवर ओळखीतील किंवानातेवाईक युवकाने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याच्या घटनांचा बलात्काराच्या गुन्ह्यात समावेश आहे. एकाच कुटुंबात राहताना शारीरिक आकर्षण किंवा विधवा, महिलेच्या असहायतेचा गैरायदा घेऊन लैंगिक अत्याचार केल्याच्या काही घटना समाेर आल्या आहेत. तर काैटुंबिक हिंसाचारातून काही बलात्काराच्या घटनांचाही या गुन्ह्यांमध्ये समावेश आहे.
प्रेमसंबंधातून सर्वाधिक बलात्कार
शाळकरी किंवा महाविद्यालयीन युवक-युवती या इंस्टाग्राम, ेसबुक, व्हाॅट्सअॅप आणि अन्य साेशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. एकमेकांना लग्नाचे आमिष दाखवतात. एकमेकांसाेबत ‘नकाे त्या अवस्थेत’ ाेटाे काढतात. त्यानंतर लग्नास नकार दिल्यास किंवा ‘ब्रेक अप’ झाल्यास ाेटाे व्हायरल केल्यानंतर पाेलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार नाेंदवितात. त्यामुळे अशा प्रेमप्रकरणातून सर्वाधिक बलात्काराच्या तक्रारी करण्यात येत असल्याची माहिती समाेर आली आहे.
महिला सुरक्षेसाठी पाेलिस दीदी, मार्शल दुर्गा, दामिनी, ऑपरेशन शक्ती राबविण्यात आले. मुली, तरुणी आणि महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे पाेलिसांचे कर्तव्य आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी पाेलिस नेहमी सज्ज असून महिलांचा पाेलिसांच्या सुरक्षेवरील विश्वास वाढला आहे.
नवीनचंद्र रेड्डी (सहपाेलिस आयुक्त, नागपूर शहर)