नांदेडच्या विकासाची ग्वाही!

12 Jan 2026 18:49:31
नांदेड,

Ashok Chavan नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) कुसुम सभागृहात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची संवाद बैठक आयोजित केली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांच्यासह अनेक पक्षनेते आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते.
 
 

 Nanded municipal elections, BJP Nanded, Ashok Chavan, 
बैठकीत अशोक चव्हाण यांनी शहरातील गुंडगिरी, माफियागिरी आणि वाहतूक कोंडी दूर करण्याचे ठाम आश्वासन दिले. “नांदेड शहरात बोटे तोडणे, डोके फोडणे यासारख्या प्रकार चिंताजनक आहेत. आगामी काळात शहरातील गुंडगिरी मोडून काढून नागरिकांना सुरक्षित वातावरण देणार,” असे त्यांनी स्पष्ट केले. चव्हाण यांनी सराफा बाजार व इतवारा परिसरातील रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक कोंडी दूर झाल्याचे उदाहरण देत, सध्या होणाऱ्या अतिक्रमणामुळे समस्या निर्माण होत असल्याचेही सांगितले.बैठकीत माजी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी शहरातील गुंड प्रवृत्तीचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचा संकल्प व्यक्त केला. व्यापारी व बांधकाम व्यावसायिकांवरील खंडणी थांबवणे, भाजप सत्तेत आल्यावर संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसवणे यासारख्या योजना त्यांनी मांडल्या. तसेच गोदावरी घाटाचे सुशोभीकरण, ‘होली सिटी’ संकल्पना, धूळमुक्त, प्रदूषणमुक्त व नशामुक्त नांदेड याचे ध्येय त्यांनी मांडले.
 
 
 
यावेळी भाजप Ashok Chavan संघटन मंत्री संजय कौडगे, माजी मंत्री डी. पी. सावंत, महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष संतुक हंबर्डे व अड. किशोर देशमुख, तसेच विविध सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक डॉ. अंकुश देवसरकर यांनी “जो बोलती तो करून दाखवतो, अशी ओळख अशोक चव्हाण यांची आहे,” असे सांगून भाजपच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
 
 
निवडणुकीसाठी नागरिकांना मतदानाचे आवाहन करत भाजपकडून शहराच्या विकासासाठी ठोस वचनांची यादीही मांडण्यात आली. डीपी प्लॅन रद्द झाल्यामुळे शहराचा विकास रखडल्याचा आरोप करत त्यांनी एमआयडीसी विस्तार, उद्योगांसाठी जागा, नांदेड-दुग्णनूर परिसराचा विकास, तसेच रेल्वे, रस्ते आणि विमानसेवेच्या माध्यमातून मिळणारी कनेक्टिव्हिटी भविष्यातील उद्योगांसाठी फायदेशीर ठरेल, असे सांगितले. विष्णुपुरी येथील कॅन्सर हॉस्पिटल, न्यायालयीन इमारतीसाठी ५०० कोटींचा निधी आणि २०० एकर विकासासाठीची जमीन याचा उल्लेखही करण्यात आला.बैठकीत हर्षद शहा, डॉ. मनीष देशपांडे, डॉ. संजय कदम, दीपक कोठारी, जयप्रकाश भराडिया, अड. आशीष गोदमगावकर, राजेंद्र हुरणे, रवी कडगे आणि डॉ. बंग यांनीही आपली मते मांडली.भाजपकडून निवडणुकीसाठी मांडलेल्या या संकल्पनांमुळे नांदेडमधील विकास आणि सुरक्षिततेवर लक्ष देण्याची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
Powered By Sangraha 9.0