अनुष्का किंवा वामिका नाही; विराट कोणाला डेडिकेट करतो प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड?

12 Jan 2026 12:11:06
बडोद्या,  
virat-player-of-the-match-award बडोद्यामध्ये काल झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला. ३०१ धावांच्या आव्हानात्मक टार्गेटचा पाठलाग करत भारताने न्यूझीलंडला फक्त ४ विकेट्सने हरवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या विजयामागे विराट कोहलीच्या दमदार खेळीचा मोठा वाटा होता. विराटने ९१ चेंडूत ९३ धावा केल्या, पण शतक थोड्याशा फरकाने हुकले. त्यासाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कार मिळाला, जो त्याचा वनडे करिअरमधील ४५ वा आणि आंतरराष्ट्रीय करिअरमधील ७१ वा POTM पुरस्कार ठरला.
 
virat-player-of-the-match-award
 
सामन्यानंतरच्या पोस्ट-मॅच सेरेमनीमध्ये विराटला विचारण्यात आले की, इतके सारे प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड्स एकत्र ठेवण्यासाठी वेगळ्या खोलीची गरज भासते का? यावर विराटने खास उत्तर दिले. त्याने सांगितले की, हे सर्व पुरस्कार तो आपल्या पत्नी अनुष्का शर्मा किंवा मुलांना देत नाही, तर त्याचे सर्व जिंकलेले ट्रॉफी आणि पुरस्कार तो आपल्या आईला पाठवतो. त्याचे म्हणणे आहे की, आईला त्याने मिळवलेल्या ट्रॉफी जपायला खूप आवडतात आणि यामुळे तिला अभिमान वाटतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्लेअर ऑफ द मॅच जिंकण्यात विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या पुढे फक्त सचिन तेंडुलकर आहेत, ज्यांनी ७६ POTM पुरस्कार जिंकले आहेत, तर विराटला आतापर्यंत ७१ वेळा हा पुरस्कार मिळाला आहे. यातील ४५ अवॉर्ड वनडे सामन्यांमधून आले आहेत. याचा अर्थ असा की, विराट लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवण्याचा विक्रम पटकावू शकतो. सचिन आणि विराट यांच्यातील अंतर फक्त ५ POTM पुरस्काराचं आहे. virat-player-of-the-match-award विराट कोहलीच्या या खुलास्याने सर्वांना जाणवले की, पुरस्कार जिंकण्यामागे तो स्वतःचा अभिमान नाही तर आईच्या अभिमानाची भावना आणि कुटुंबातील प्रेम किती महत्त्वाचं आहे.
सौजन्य : सोशल मीडिया 
Powered By Sangraha 9.0