लॉस एंजेलिस,
Owen Cooper, २०२६ च्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांचा भव्य सोहळा सुरु झाला असून, लहान वयातही अपूर्व कामगिरी साकारलेल्या कलाकारांना सन्मानित करण्यात आले. यंदाच्या सोहळ्यात १६ वर्षीय अभिनेता ओवेन कूपरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन त्याचे कौतुक करण्यात आले, ज्यामुळे शोच्या ग्लॅमरस वातावरणात आणखी भर पडली.
ओवेन कूपरने हा पुरस्कार Owen Cooper, स्वीकारल्यानंतर स्टेजवर उभा राहणे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे असल्याचे सांगितले. “माझे कुटुंब आणि मी एका अविश्वसनीय प्रवासातून जात आहोत,” असे ओवेन म्हणाला. त्याच्या बोलण्यावर सभागृहात उपस्थित कलाकारांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. त्याने पुढे सांगितले, “या लोकांनी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी जे काही केले आहे त्याबद्दल आम्ही नेहमीच आभारी राहू.”ओवेनच्या सुरुवातीच्या अभिनयाच्या दिवसांची आठवण करून देताना, त्याने सांगितले की तो ड्रामा क्लासमध्ये खूप लाजिरवाणा होता आणि बराच काळ एकटाच राहायचा. “ते लाजिरवाणे होते, पण मी त्यावर मात केली. मी माझ्या सभोवतालच्या अनुभवी कलाकारांकडून शिकत राहतो,” असे त्याने नमूद केले. त्याने सर्वांच्या आभारही मानले.
ओवेनसाठी हा Owen Cooper, पुरस्कार विशेष महत्वाचा ठरला आहे, कारण यापूर्वी त्याने नेटफ्लिक्सवरील अॅडलेसेन्स मालिकेत उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी एमी पुरस्कार जिंकला होता, ज्यामुळे तो एमी इतिहासातील सर्वात तरुण पुरुष विजेत्या अभिनेता म्हणून नाव कमावले. यावेळी गोल्डन ग्लोबमध्ये त्याने अॅशले वॉल्टर्स, बिली क्रुडअप, जेसन आयझॅक, ट्रॅमेल टिलमन आणि वॉल्टन गॉगिन्स यांसारख्या अनुभवी कलाकारांशी स्पर्धा केली.या वर्षी अॅडलेसेन्स मालिकेला एकूण पाच गोल्डन ग्लोब नामांकनही मिळाले असून, ओवेनच्या अभिनयामुळे मालिकेला प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनच सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.