पंढरपूर,
Pandharpur bridge accident, चंद्रभागा नदीवरील अहिल्या पुलावर रविवारी (11 जानेवारी) रात्री ९ वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर आणि मालवाहतूक करणारा कंटेनर समोरासमोर धडकले, त्यानंतर दोन्ही वाहनं पुलावरून खाली कोसळली. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने पंढरपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले Pandharpur bridge accident की, समोरून येणाऱ्या मोटरसायकलला वाचण्याच्या नादात हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक अहिल्या पुलाकडे धावले आणि जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था केली.पुलावर पलटी झालेल्या ट्रकला सरळ करण्यासाठी क्रेन मागवण्यात आली असून, घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी नियंत्रण ठेवले आहे आणि पुढील तपास सुरु आहे.