त्वरित जाणून घ्या आपले मतदान केंद्र; मनपाचा नवा डिजिटल उपक्रम सुरू

12 Jan 2026 19:00:20
नागपूर,  
municipal-corporation-digital-initiative नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आपले मतदान केंद्र सहज आणि तात्काळ शोधता यावे, यासाठी मनपाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. या सुविधेमुळे आता मतदारांना मतदान केंद्र शोधण्यासाठी कुठलाही गोंधळ राहणार नाही.
 
municipal-corporation-digital-initiative
 
मनपाचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत या नव्या सुविधेची सविस्तर माहिती दिली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर शहरातील मतदारसंख्येत वाढ झाल्यामुळे काही मतदारांची मतदान केंद्रे बदलली जाण्याची शक्यता आहे. यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, म्हणून हा डिजिटल उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सुविधेमुळे मतदार मनपाच्या अधिकृत संकेतस्थळासह ‘माय नागपूर’ अ‍ॅप, मनपाचा चॅटबॉट आणि एआय मित्राच्या माध्यमातून आपले मतदान केंद्र शोधू शकणार आहेत. municipal-corporation-digital-initiative मनपाचे माहिती व तंत्रज्ञान अधिकारी स्वप्निल लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली या डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे.
अशा प्रकारे शोधा आपले मतदान केंद्र
सर्वप्रथम नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या – www.nmcnagpur.gov.in
संकेतस्थळावर ‘आपले मतदान केंद्र’ ही विंडो उपलब्ध आहे
या विंडोवर क्लिक केल्यानंतर मतदारांनी आपले नाव किंवा मतदार ओळखपत्राचा ईपीआयसी (वोटर आयडी) क्रमांक नोंदवावा
त्यानंतर संबंधित प्रभाग क्रमांक भरावा
आवश्यक माहिती नोंदवल्यानंतर स्क्रीनवर मतदाराचे मतदान केंद्राचे नाव दिसून येईल
याच ठिकाणी ‘डिटेल’ असा पर्याय उपलब्ध असेल
‘डिटेल’वर क्लिक करताच मतदान केंद्राचा अचूक नकाशा पाहता येईल आणि केंद्रापर्यंत जाण्याचा मार्गही स्पष्ट होईल
याशिवाय व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारेही मतदार या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. यासाठी 7397807397 या क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहे. municipal-corporation-digital-initiative मनपाने सुरू केलेल्या या डिजिटल सुविधेमुळे मतदारांना मतदान केंद्र शोधणे अधिक सोपे, जलद आणि पारदर्शक होणार असून निवडणूक प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढण्यास यामुळे मदत होणार आहे.
Powered By Sangraha 9.0