बुलढाणा,
Rashtra Mata Jijau राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेब यांच्या जन्मोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दि. १२ जानेवारी सिंदखेड राजा येथील लखुजीराव जाधव राजवाड्यातील जिजाऊ जन्मस्थळी भेट देवून अभिवादन केले. यावेळी त्यांनी जिजाऊ सृष्टीस भेट दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी आदित्य सिंग, तहसीलदार अजित दिवटे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, राज्य संघटक मनोहर तुपकर, जिल्हाध्यक्ष रविंद्र चेके, व्यवस्थापक सुभाष कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.