नागपर,
smuggling migratory नागपूर लगतच्या विविध तलावांवर बार-हेडेड गूस (पट्टकादंब) यासह नॉर्दर्न पिनटेल (तलवार रेड-क्रेस्टेड पोचार्ड (लालसरी), कॉटन पिग्मी गूस (नदी सुरी), व्हिसलिंग डक (शिटी बदक), फेरुगिनस डक (लोहसरी) आणि इतर पाणपक्षी हिवाळयात दाखल होतात. मात्र काही पक्षी विक्रेते तलावाशेजारी जाळी टाकून पक्ष्यांना पकडण्याचे काम करीत असल्याचे उघड झाले आहेत.
कळमेश्वर लगतच्या डोरली येथील जलाशयाच्या काठावर सकाळी १०.३०वाजताच्या सुमारास पक्षी निरीक्षकांना बार-हेडेड गूस हा पांढरा पक्षी जाळीत पकडून एक पक्षी विक्रेता दिसून आला. पक्षी निरीक्षक नितीन मराठे , रोहित हजारे यांनी तातडीने वनविभागाकडे तक्रार करीत कारवाईची मागणी केली. वन विभाागाच्या डोरली येथील क्षेत्र सहायक आर.वाय.साबळे, वनसंरक्षक एस.पी. कुहिटे यांनी उधामसिंग या व्यक्तीस चौकशीकरिता घेतल्यानंतर त्याच्याकडे बार-हेडेड गूस हा पक्षी आढळून आला. अधिक चौकशी केली असता हा पक्षी आपण घरी घेवून जात असल्याचे उधामसिंग याने सांगितले. परंतू पक्षी संरक्षण कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला अशाप्रकारे देशी विदेशी पक्ष्यांना जवळ ठेवता येत नसल्याने वन विभागाच्या क्षेत्र सहायक आर.वाय.साबळे यांनी पुढील कारवाई करीत बार-हेडेड गूस या पक्ष्याला वातावरणात सोडण्यासाठी पंचनामा केला. यानंतर पक्षी निरीक्षकांसमोरच बार-हेडेड गूस या पक्ष्याला निसर्गमुक्त करण्यात आले.smuggling migratory यावेळी अथर्व मंगळूकर, हिमांशू गुंडे, यश नांदूरकर, आनंद भंडारी आदी होते. स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धनासाठी आणि जिल्ह्यातील प्रमुख तलावांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक झाले असून पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलणे व जनजागृती करणे ही काळाची गरज असल्याचे हजारे यांनी सांगितले.