वर्धा : शहरात Sterilization of dogs भटया श्वानांचा हैदोस पहायला मिळत आहे. यासोबतच दिवसेंदिवस त्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भटया श्वानांनी नागरिकांचे लचके तोडल्याच्या अनेक घटना उजेडात येत असतानाच नप प्रशासन अॅशन मोडवर आला आहे. शहरात सन २०२४ च्या गणनेनुसार २ हजार भटके श्वान आढळून आले आहेत. या श्वानांची संख्या कमी करण्यासाठी नप प्रशासनाने पाऊल उचलले आहे. यापूर्वी ६३५ श्वानांचे निर्बिजीकरण झाले असून उर्वरित श्वानांवरही प्रक्रिया करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात २०० श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात येणार असून वर्षभरात २ हजार भटया श्वानांचे निर्बिजीकरण करण्याचा मानस नपचे मुख्याधिकारी विजय देशमुख यांनी व्यत केला आहे.
Sterilization of dogs भटया श्वान लहान मुले आणि वृद्ध नागरिकांवर हल्ला करीत आहेत. शहरात विविध ठिकाणी भटया श्वानांचा जणू कळपच दिसून येतो. घरासमोर खेळणार्या मुलांवर तसेच रात्री कामावरून परतणार्या नागरिकांवर चाल करतात. रात्री श्वान दिसताच वाहनचालकांचे लक्ष विचलित होते. त्यामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. अनेकांचे लचके तोडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंबंधिच्या अनेक तक्रारी नगरपरिषदेला प्राप्त झाल्या. दरम्यान, या श्वानांची पैदास रोखण्यासाठी नप प्रशासनाने श्वानांचे निर्बिजीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी २ हजार भटया श्वानांचे निर्बिजीकरण करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. तो मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी ६३५ श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे. आता उरलेल्या १ हजार ३६५ श्वानांपैकी २०० श्वानांचे निर्बिजीकरण केले जाणार आहे. वर्षभरात ही निर्बिजीकरणाची कारवाई सुरूच राहणार आहे.