लाडक्या बहिणींना लवकरच २१०० रुपयांचा हफ्ता खात्यात

12 Jan 2026 16:56:32
मुंबई/नांदेड,
mazi ladaki bahin yojana राज्यातील लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या मिळणारा १५०० रुपयांचा मासिक हफ्ता वाढवून २१०० रुपये करण्याबाबत राज्य सरकारकडून हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळाले आहेत. यासंदर्भात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाचे विधान केले असून, या निर्णयासाठी सरकारचा सखोल अभ्यास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
 

japan-rare-earth-metal-mining 
नांदेड येथे शिवसेना mazi ladaki bahin yojana शिंदे गटाच्या जाहीर सभेत बोलताना उदय सामंत यांनी सांगितले की, “लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यासाठी आमचा अभ्यास सुरू आहे. योग्य वेळी याबाबत निर्णय घेतला जाईल. कोणत्याही अफवा किंवा गैरसमजांना बळी पडू नका.” त्यांच्या या वक्तव्यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीमधील पक्षांनी सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींचा मासिक हफ्ता १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मात्र महायुती सरकार स्थापन होऊन काही महिने उलटूनही या वाढीची अधिकृत घोषणा झालेली नसल्याने राज्यातील लाखो लाभार्थी महिला सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत.दरम्यान, लाडकी बहीण योजनेबाबत सोशल मीडियावर विविध संदेश व्हायरल होत असून, मतदानाच्या आदल्या दिवशी ३००० रुपये मिळणार असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे. मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसल्याने सरकारकडून अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात येत आहे.
 
 
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने माहिती दिली जात असून, २१०० रुपयांच्या हफ्त्याचा निर्णय नेमका कधी जाहीर होणार याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. सरकारचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर योग्य वेळी ठोस निर्णय घेतला जाईल, असे संकेत मंत्र्यांच्या वक्तव्यातून मिळाले आहेत.
Powered By Sangraha 9.0