गाझा,
warning-from-hamas-in-gaza गाझामध्ये हमास आणि इस्रायल यांच्यात झालेल्या शांतता करारानंतर काही महिन्यांनी आता हमासकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने ठरलेल्या शांतता योजनेनुसार पॅलेस्टिनी प्राधिकरणाकडे गाझाचा कार्यभार सोपवल्यानंतर गाझामधील आपली सध्याची सरकार व्यवस्था बरखास्त केली जाईल, असे हमासने रविवारी स्पष्ट केले. मात्र ही सरकार नेमकी कधी विसर्जित केली जाईल, याबाबत कोणतीही ठोस वेळमर्यादा जाहीर करण्यात आलेली नाही.

हमासचे प्रवक्ते हाजेम कासेम यांनी टेलिग्रामवरील पोस्टद्वारे शांतता समितीच्या स्थापनेची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. या समितीमध्ये कोणाची नियुक्ती केली जाणार, याबाबत अद्याप हमास किंवा त्यांचा प्रतिस्पर्धी असलेल्या पॅलेस्टिनी प्राधिकरणाने अधिकृत नावे जाहीर केलेली नाहीत. warning-from-hamas-in-gaza मात्र या समितीतील सदस्य राजकीय पार्श्वभूमीचे नसतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर फिलिस्तीनी प्राधिकरणाला मान्यता आहे, हे विशेष. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय ‘बोर्ड ऑफ पीस’ हा निकाय, गेल्या वर्षी १० ऑक्टोबरला झालेल्या युद्धविराम कराराअंतर्गत सरकार स्थापन प्रक्रियेवर आणि इतर महत्त्वाच्या बाबींवर देखरेख करणार आहे. यामध्ये हमासचे निशस्त्रीकरण तसेच आंतरराष्ट्रीय सुरक्षा दलाची तैनाती यांचाही समावेश आहे. मात्र या बोर्डमधील सदस्यांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.
या पार्श्वभूमीवर इजिप्तमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की, शांतता योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत हमास इजिप्त, कतार आणि तुर्कियेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आपले प्रतिनिधीमंडळ पाठवत आहे. warning-from-hamas-in-gaza समितीच्या अंतिम रचनेसाठी या आठवड्यात हमास इतर फिलिस्तीनी गटांशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व हमासचे वरिष्ठ वाटाघाटीकार खलील अल-हय्या करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.