वाशीम न. प. उपाध्यक्ष व विषय समिती सभापतीची आज निवड

12 Jan 2026 17:30:47
वाशीम,
Washim deputy mayor election वाशीम नगर परिषदेची निवडणुक २० डिसेंबर रोजी होवून अध्यक्षपदी भाजपाचे अनिल केंदळे हे जनमतातून निवडुन आले. तसेच भाजपा पक्षाचे १४ तर शिवसेना उबाठा पक्षाचे १३, काँग्रेस २ व एमआयएम २ असे सदस्य संख्याबळ आहे.त्यामुळे या नगर परिषदमध्ये कोण्या एका पक्षाला बहुमत नसले तरी भाजपा व शिवसेना उबाठ पक्षाची युतीचा निर्णय झाल्याने उपाध्यक्षपद उबाठा पक्षाला देण्यात येणार आहे. याचवेळी विषय समिती सभापती व स्वीकृत सदस्याची देखील निवड होणार आहे.
 

Washim deputy mayor election 
वाशीम नगर परिषदेच्या १६ प्रभागातील ३२ नगरसेवक पदासाठी २० डिसेंबर रोजी निवडणुक पार पडली. त्यामध्ये अध्यक्षपदासाठी भाजपाचे अनिल केंदळे व शिवसेना उबाठा पक्षाचे रेखा सुरेश मापारी यांच्यात लढत होवून अनिल केंदळे मोठ्या मताधियाने निवडुन आले. नगरसेवक पदासाठी भाजपा पक्षाचे १४ नगरसेवक तर उबाठा पक्षाचे १३ नगरसेवक निवडुन आले. काँग्रेस व एमआयएम प्रत्येकी २ सदस्य तर एक अपक्ष उमेदवार निवडुन आला. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक असलेला १७ मताचा आकडा कोणत्याच पक्षाकडे नसल्याने उपाध्यक्ष निवडीचा मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र, स्थानिक पातळीवरील नेत्यांनी एकत्र येत भाजपा व शिवसेना उबाठा अशी युती करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये उबाठा पक्षाला उपाध्यक्ष व सभापतीपद देण्याचे ठरले. स्वीकृत सदस्य व विषय समिती सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
भाजप आणि शिवसेना उबाठा यांच्यातील ही युती केवळ एका पदापुरती मर्यादित नाही तर, नगर परिषदेचा गाडा सुरळीत चालवण्यासाठी सभापती पदे, विषय समिती आणि स्वीकृत सदस्य यामध्येही समसमान आणि योग्य वाटाघाटी करण्याचे ठरले आहे. सत्तेच्या या वाटपावर दोन्ही गटांच्या वरिष्ठांमध्ये सहमती झाली असून, यामुळे वाशीमच्या राजकारणात एक अभेद्य व मजबुत सत्ता स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Powered By Sangraha 9.0