गडचिरोली,
aadhaar-vishwa-foundation : आधारविश्व फाऊंडेशन गडचिरोली या संस्थेला जिल्हाधिकारी यांच्या कक्षामध्ये सोमवारी, 12 जानेवारी रोजी जिल्हा युवा पुरस्कार जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह व 50000 रुपये रोख अशा प्रकारचे होते.
गडचिरोली जिल्ह्यात युवांसाठी मागील नऊ वर्षांपासून अविरत कार्य केल्यामुळे या पुरस्कारासाठी आधारविश्व फाऊंडेशनची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे व जिल्हा क्रीडा कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.
आधारविश्व फाउंडेशनच्या अध्यक्षा स्व. गीता सुशील हिंगे यांनी हा प्रस्ताव सादर केला होता. त्यांच्या मरणोपरांत हा पुरस्कार मिळाला. त्यामुळे आधारविश्व फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी यावेळी भाऊक झाले होते. आधारविश्व फाऊंडेशनचे सुशील हिंगे, विजय साळवे, सुनीता साळवे, सुचिता धकाते, सिमा कन्नमवार, सुनीता आलेवार, भारती खोब्रागडे, भूमी गोरडवार, शिव सांगिडवर उपास्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना संपूर्णता अभियान अंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने काश्य पदक देऊन सम्मान केला. त्या प्रित्यर्थ आधारविश्व फाउंडेशन गडचिरोलीतर्फे गुलदस्ता देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.