धारणी,
dharni-nagar-panchayat : १७ नगरसेवक असलेल्या धारणी नगर पंचायतच्या उपाध्यक्षा पदावर मंगळवारी काँग्रेसच्या आशाबी अकबर खान निवडून आल्याने पुन्हा मेळघाटच्या राजकारणाने कलाटणी घेतल्याने खळबळ माजलेली आहे.
अध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपाचे सुनील चौथमल निवडून आल्यानंतर नगरसेवकाच्या निवडणुकीत खंडीत जनादेश आलेला असताना माजी आमदार राजकुमार पटेल यांनी दोन मतांचा जुगाड करुन भाजपापा डीवचले आहे. १३ जानेवारी रोजी असलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार आशाबी खान या भाजपाचे प्रतिक मालवीय यांना पराभूत करुन निवडून आल्या. मालवीय यांना ७ तर आशाबीला १० मते मिळाली. तिसरे उमेदवार सूरज मालवीय यांना एक मत मिळाले. अखंडीत जनादेशाप्रमाणे काँग्रेस ८, भाजपा ४, शिवसेना १, राष्ट्रवादी १ तर तीन नगरसेवक अपक्ष म्हणून विजयी झालेले होते.
मंगळवारी न. पं. कार्यालयात मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्या उपस्थितीत निवडणूक पार पडली. अध्यक्षांना धरुन भाजपाकडे ७ मते होती तर काँग्रेसकडे १० मते. आशाबीची निवड होताच काँग्रेसने न. पं.त आपले वर्चस्व सिद्ध करुन दाखविले. राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वात विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. विजयी मिरवणूक काढण्यात आली. काँग्रेसच्या या विजयाचे शिल्पकार ठरले रोहित पटेल, पंकज मोरे, गोलू खान, राजा खान, सै. खालीद, नगरसेवक मिना मोहोड, संतोष चौबे, डॉ. शैलेश जिराफे, स्वीकृत सदस्य राजकिशोर मालवीय, अनिता पाखरे, मलिक शेख, शे. मुख्तार, राजकुमार मालवीय, हरेराम मालवीय, महेंद्र मालवीय, काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष महेंद्र गैलवार, विनोद वानखडे यांनी प्रयत्न केले. आता सभापतीच्या निवडणुकीवर लक्ष लागलेले आहे.