धाव आरोग्यासाठी, धाव युवा शक्तीसाठी!

13 Jan 2026 18:49:22
लाखनी,
marathon-competition : स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा, लाखनीतर्फे दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी समर्थ ग्राउंड, मुरमाडी येथे भव्य ‘मॅरेथॉन स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७.३० वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
 
 
 
JK
 
 
‘धाव आरोग्यासाठी, धाव युवा शक्तीसाठी’ या संदेशासह आयोजित या मॅरेथॉनमध्ये विविध वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सर्व सहभागी स्पर्धक व आयोजकांचे अभिनंदन करण्यात आले.
 
 
या कार्यक्रमाचे उद्घाटन अविनाशभाऊ ब्राह्मणकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून घनश्याम खेडीकर (खरेदी-विक्री बाजार समिती, लाखनी), श्री. संदीप भांडारकर (नगरसेवक, लाखनी), डॉ. श्रीकांत भुसारी (जिल्हाध्यक्ष, ओबीसी मोर्चा भाजपा, भंडारा), श्री. घनश्याम मते (ग्रामीण तालुका अध्यक्ष, भाजपा, पालांदूर मंडळ), महेश आकरे (शहराध्यक्ष, भाजपा, लाखनी), गिरी बावनकुळे (पंचायत समिती सदस्य, लाखनी) उपस्थित होते. तसेच सौ. माहेश्वरीताई नेवारे (जिल्हाध्यक्ष, भाजपा महिला मोर्चा, भंडारा) व सौ. रेवताताई पटले (अध्यक्ष, भाजपा महिला मोर्चा, लाखनी-लाखोरी मंडळ) यांनीही उपस्थित राहून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात आदित्य बांते (अध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, ता. लाखनी), अश्विन धरमसहारे (अध्यक्ष, युवा मोर्चा, लाखनी शहर) यांच्यासह आशिष कामडी, साकेत शेलोकर, माहीम तरोने, लोकेश लांजेवार, योगेश तितीरमारे, सुमित मेघराजांनी, गिरीश वंजारी आदी कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान लाभले. या मॅरेथॉन स्पर्धेमुळे युवकांमध्ये आरोग्याविषयी जागृती निर्माण होत असून, स्वामी विवेकानंदांच्या विचारांना अनुसरून युवक शक्तीला सकारात्मक दिशा देणारा हा उपक्रम ठरल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
Powered By Sangraha 9.0