वर्धा,
bus-motorcycle-accident : भरधाव दुचाकी आणि कारची समोरासमोर घडक झाली. हा अपघात मंगळवार १३ रोजी वर्धा-वायगाव (नि.) मार्गावरील जवाहर नवोदय विद्यालय समोर झाला. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. भारत भगत (५०) रा. वायगाव (नि.), असे मृताचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, एम एच. ३२- ए. जी. ४०७३ या क्रमांकाच्या दुचाकीने भारत भगत हे नियोजित ठिकाणी जात होते. तर एम. एच. ४०- ए. यू. ६३५१ क्रमांकाची बस प्रवासी घेवून खानगावच्या दिशेने जात होती. दोन्ही वाहने वायगाव मार्गावरील जवाहर नवोदय विद्यालय समोर आली असता दोघांना समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार भारत भगत याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद सावंगी पोलिसांनी घेतली आहे.