यवतमाळ,
महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प रबी हंगामासाठी e-peek pahani ई-पीक पाहणी डीसीएस उपक्रमाची सुरुवात 10 डिसेंबर 2025 पासून करण्यात आलेली आहे. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या सातबारा उताऱ्यावर पिकपेरा स्वतः अँड्रॉइड मोबाईलद्वारे नोंदणी करायची आहे. शेतकरी स्तरावर पीक पाहणीसाठी 24 जानेवारी ही अंतिम मुदत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
e-peek pahani जिल्ह्यात आतापर्यंत 46 हजार 570.38 हेक्टर आर क्षेत्रावर पिक पेरा असून, एकूण 5 लाख 67 हजार 536 मालक प्लॉटपैकी केवळ 34 हजार 801 प्लॉटवर शेतकèयांनी डीएससी व्हर्जन 4.0.5 या मोबाईल अॅपद्वारे ई-पीक पाहणीची नोंद केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत फक्त 6.13 टक्के प्लॉटवरच ई-पीक पाहणीची नोंदणी झालेली आहे. उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी तातडीने ई-पीक पाहणी अॅपद्वारे आपल्या पिकांची नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ई-पीक पाहणीसाठी अँड्रॉइड मोबाईल आवश्यक असून, संबंधित अॅप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यापूर्वी ‘गुगल क्रोम’ अपडेट करणे आवश्यक आहे. शेतकèयांनी थेट शेत बांधावर जाऊन पीक नोंदणी करून माहिती अपलोड करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
e-peek pahani ज्या शेतकऱ्यांकडे मोबाईल उपलब्ध नाही किंवा अॅप वापरण्यात अडचण येत असेल, त्यांनी गावचे तलाठी, कोतवाल, नियुक्त सहायक, तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर यांच्या मदतीने ई-पीक पाहणीची नोंद करून घ्यावी. अॅप संदर्भात कोणतीही अडचण असल्यास संबंधित अधिकारी किंवा नियुक्त सहायक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ई-पीक पाहणीची नोंदणी न केल्यास संबंधित 7/12 उताऱ्यावर पीक पेरा कोरा राहील, जो नंतर भरता येणार नाही. त्यामुळे पीक विमा, शासकीय अनुदान व इतर लाभ मिळवताना अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच अवेळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी पीकविमा मिळवण्यासाठी सातबारावर अचूक पीक नोंद असणे अनिवार्य आहे. सर्व शेतकरी बांधवांनी 24 जानेवारीपूर्वी अनिवार्यपणे ई-पीक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.