सासऱ्याची हत्या करणारा जावई अटकेत

13 Jan 2026 18:47:23
भंडारा,
father-in-law-murdered :  संपत्तीच्या वादातून सासऱ्याची हत्या करून मृतदेह पुलाखाली लपवून ठेवणाऱ्या जावई आणि त्याच्या मित्राला शारदा पोलिसांनी अखेर अटक केली आहे. 9 जानेवारी रोजी ही हत्या झाली होती.
 
 
JK
 
भंडारा तालुक्यातील कोकणाकडी येथील मूळ रहिवासी असलेल्या किशोर कंगाले या 65 वर्षीय व्यक्ती गायब झाल्याची तक्रार त्यांचा पुतण्या मंगेश कंगाले याने कारधा पोलीस ठाण्यात केली होती. दरम्यान तपास सुरू असताना 11 जानेवारी रोजी धारगाव कोकणागड मार्गावर असलेल्या एका पुलाखाली किशोरी यांचा मृतदेह सापडला होता. दरम्यान काकाची हत्या त्यांचा जावई अमित लांजेवार व मित्रांनी मिळून केली अशी तक्रार पुतण्या मंगेश याने कारधा पोलिसात दिल्यानंतर अमित लांजेवार व त्याच्या मित्रा विरोधात कलम 103 (1), 126(2) व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक नुरुल हसन आणि अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आरोपीचा शोध घेत 12 जानेवारी रोजी रात्री अमित लांजेवार याला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या हत्तीत सहभागी असलेल्या त्याचा मित्र योगेश पाठक यालाही पोलिसांनी अटक केली आहे. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचे सांगितले जाते. दोन्ही आरोपी भंडारा पोलिसांच्या ताब्यात आहे.
Powered By Sangraha 9.0