नगराध्यक्षांसह गोंदियाच्या १६ नगरसेवकांचे पदग्रहण

13 Jan 2026 19:18:54
गोंदिया, 
mayor-corporator-taking-office : स्थानिक नगर परिषदेच्या राजकारणात एका नवीन पर्वाची सुरुवात झाली. महाविकास आघाडीचे नवनियुक्त नगराध्यक्ष सचिन शेंडे यांच्यासह १६ नगरसेवकांनी मंगळवारी, १३ जानेवारी रोजी आपला पदभार स्वीकारला. या सोहळ्याच्या निमित्ताने गोंदियात महाविकास आघाडीने मोठे शक्तीप्रदर्शन केले.
 
 
 
KL
 
 
 
कार्यक्रमाची सुरुवात शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गांधी प्रतिमा चौकात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नमन करण्यात आले. दरम्यान, नगर परिषदेच्या सभागृहात पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यात माजी आमदार गोपालदास अग्रवाल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दिलीप बंसोड, काँग्रेस प्रदेश सचिव अमर वराडे, गप्पू गुप्ता, शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक पंकज यादव यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0