हिंगणघाट,
nilesh-thobare : हिंगणघाट नगरपरिषदेत नगराध्यक्षा डॉ. नयना तुळसकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष व चार स्वीकृत नगरसेवकांची निवडणूक सभा पार पडली.
उपाध्यक्षपदासाठी भाजपचे निलेश ठोबरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची अविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. स्वीकृत नगरसेवकांच्या चार जागा होत्या. त्यात संख्याबळनुसार भाजपचे तीन व एक राकाँ ( अजित पवार ) गट यांच्या पक्षाच्या गटनेत्यांनी आपआपल्या पक्षातर्फे उमेदवारी अर्ज सादर केले.
भाजपा गट नेते भूषण पिसे यांनी अनुक्रमे शारदा पटेल, अंकुश ठाकूर व किशोर दिघे यांच्या नावाचे अर्ज अध्यक्षांकडे सुपूर्द केले. तर राकाँ गट नेते विनोद झाडे यांनी ज्येष्ठ नेते अॅड. सुधीर कोठारी यांचा उमेदवारी अर्ज सादर केला. एकूण चार जागेसाठी चारच उमेदवारी अर्ज आल्याने नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांनी या चारही उमेदवारांना विजयी घोषित केले. पिठासीन सभापती डॉ. नयना तुळसकर यांना मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे व विशाल ब्राम्हणकर यांनी सहकार्य केले.